scorecardresearch

Premium

Rishabh Pant: टीम इंडियाचे सराव शिबीर सुरु असताना ऋषभ पंतची सरप्राईज भेट, रोहित-कोहलीशी केली चर्चा; Video व्हायरल

Rishabh Pant Video: आशिया कप २०२३साठी टीम इंडियाच्या शिबिराच्या शेवटच्या दिवशी, रोहित आणि अय्यर खेळपट्टीवर फलंदाजी करत होते, अचानक ऋषभ पंत टीम इंडियाला शुभेच्छा देण्यासाठी तिथे आला.

Team India before leaving for Asia Cup Rishabh Pant also reached the camp to say good luck Watch Video
दिवसअखेर ऋषभ पंतने संघाला सरप्राईज भेट दिली, सौजन्य- हॉटस्टार (ट्वीटर)

Asia Cup 2023 Team India Camp Rishabh Pant: आशिया चषक २०२३च्या आधी बंगळुरू येथे सुरू असलेल्या टीम इंडिया कॅम्पच्या शेवटच्या दिवशी कर्णधार रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर जोरदार फलंदाजी करताना दिसले. दोन्ही फलंदाजांनी बराच वेळ क्रीजवर राहून फलंदाजी केली. दरम्यान, त्याने सर्वाधिक वेगवान गोलंदाजांचा सामना केला. मात्र, सरावाच्या मधल्या काळात त्याला फिरकीचा सामना करावा लागला. पण संघाचे लक्ष भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यापूर्वी शाहीन आफ्रिदीच्या आव्हानावर मात करण्यावर राहिले. दिवसअखेर ऋषभ पंतने संघाला सरप्राईज भेट दिली, त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

२४ ऑगस्टपासून एनसीएमध्ये सुरू असलेल्या कॅम्पच्या शेवटच्या दिवशी कर्णधार रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर सकाळपासूनच खेळपट्टीवर फलंदाजी करत होते. प्रथम त्याचा सामना मोहम्मद शमी आणि सिराज यांच्याशी झाला. दोन्ही वेगवान गोलंदाजांनी रोहित-अय्यरला बराच वेळ गोलंदाजी केली. यानंतर यश दयाल या उंच डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाच्या गोलंदाजीचा त्यांनी सराव केला. यश दयालचा सामना करण्यामागचा उद्देश पाकिस्तानी वेगवान आक्रमणाचा मुख्य गोलंदाज शाहीन आफ्रिदीची तयारी करणे हा होता.

Mohammad Amir Praises Virat Video Viral
VIDEO : विराटच्या नेतृत्वाखाली खेळायला आवडेल की बाबरच्या? पाकिस्तानच्या गोलंदाजाने दिले चकीत करणारे उत्तर
Rohit Sharma angry video in IND vs ENG 3rd test in rajkot
IND vs ENG 3rd Test : सरफराजच्या धावबादनंतर रोहित शर्मा जडेजावर संतापला, VIDEO होतोय व्हायरल
Irfan Pathan and Safa Baig Wife
इरफान पठाणने पहिल्यांदाच दाखविला पत्नीचा चेहरा; लग्नाच्या ८व्या वाढदिवसानिमित्त केली पोस्ट
MS Dhoni participating in a friend's engagement Video has gone viral
MS Dhoni : मित्राच्या साखरपुड्यात विधी समजावून सांगताना दिसला माही, VIDEO होतोय व्हायरल

हेही वाचा: World Cup 2023: “मला आव्हाने…”, विराट कोहलीने विश्वचषकापूर्वी पाकिस्तानसह विरोधी संघांना दिला इशारा

अय्यरला जसप्रीत बुमराहने गोलंदाजी केली

स्टार स्पोर्ट्सने शिबिराच्या शेवटच्या दिवसाचा व्हिडीओ जारी केला आहे. त्यात श्रेयस अय्यरला सपोर्ट करण्यासाठी रोहित शर्मानंतर शुबमन गिल आला. गिल आणि अय्यर यांनी दुखापतीतून परतलेल्या जसप्रीत बुमराह आणि वेगवान गोलंदाज अनिकेत चौधरी यांचा सामना केला. पुनर्वसनातून परतलेल्या अय्यरने शिबिराच्या शेवटच्या दिवशी दीर्घकाळ फलंदाजी केली.

हेही वाचा: Asia Cup 2023: सॅमसन-बुमराह आशिया कपसाठी भारतीय संघात सामील, NCA शिबिरात टीम इंडियाची जोरदार तयारी; पाहा Video

ऋषभ पंत शिबिरात पोहोचला, सहकाऱ्यांची घेतली भेट

आशिया चषक शिबिराच्या शेवटच्या दिवशी ऋषभ पंत एनसीएमध्ये पोहोचला, जिथे त्याने सर्व संघातील सदस्यांची भेट घेतली. श्रीलंकेला रवाना होण्यापूर्वी पंतने सर्वांना शुभेच्छा दिल्या. भारतीय संघ २९ ऑगस्टला रवाना होणार आहे. अपघातानंतर पंत अजूनही रिकव्हरी मोडमध्ये आहे. तो अद्याप पूर्णपणे क्रिकेटमध्ये परतलेला नाही. मात्र, आता त्याची प्रकृती सुधारू लागली आहे.

पंत इंग्लंडविरुद्ध पुनरागमन करू शकतो

ऋषभ पंत सध्या बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये रिहॅबिलिटेशन प्रक्रियेतून जात आहे. तो नुकताच क्रिकेटच्या खेळपट्टीवर परतला आहे. पंतचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता ज्यात तो एका स्थानिक स्पर्धेत फलंदाजी करताना दिसत होता. कार अपघातानंतर पंतने पहिल्यांदाच फलंदाजी केली. पुढील वर्षी इंग्लंडविरुद्धच्या मायदेशातील कसोटी मालिकेतून तो क्रिकेटमध्ये पुनरागमन करेल, असे मानले जात आहे.

फिरकी आक्रमणाचा सामना करण्याची तयारी केली

दिवसाच्या शेवटच्या सत्रात भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर या फिरकी गोलंदाजांना सामोरे गेले. जिथे दोन्ही फलंदाजांनी बरेच स्वीप शॉट्स मारले. यादरम्यान रवींद्र जडेजा, साई किशोर आणि राहुल चहल या फिरकी गोलंदाजांनी गोलंदाजी केली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rishabh pant surprised the indian team suddenly arrived at the practice camp fun with kuldeep video viral avw

First published on: 29-08-2023 at 12:46 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×