भारतीय संघातील जलदगती गोलंदाज दीपक चहरच्या आग्रा येथील राहत्या घरी चोरांनी चोरीचा प्रयत्न केला. शाहगंज पोलिसांनी या प्रकरणी सहा जणांना अटक केली आहे. चहरच्या आईने योग्य वेळी अलार्म वाजवल्याने चोरांना अटक करता आले आणि त्यांना चांगलीच अद्दल घडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चहरच्या आग्रा येथील राहत्या घरात त्याची आई एकटी होती. या सहा जणांनी या परिसरात अनेक चोऱ्या केल्यामुळे पोलीस त्यांच्या मागावर होते. अखेरीस चहरच्या आईच्या हुशारीमुळे या चोरांना पकडण्यात पोलिसांना यश आले. रुपकिशोर, राजकुमार, विजय खुशवाह, दश्रथ, दिनदयाल आणि राकेश अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

नुकत्याच पार पडलेल्या आशिया चषक स्पर्धेत चहरने भारतीय संघात पदार्पण केले होते. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने आशिया चषक जिंकला. चहरने इंडियन प्रीमिअर लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून उल्लेखनीय कामगिरी केली होती आणि त्याच जोरावर त्याला भारतीय संघात संधी मिळाली. आशिया चषक स्पर्धेत अफगाणिस्तानविरुद्ध त्याने चार षटकांत ३७ धावा देत एक गडी टिपला होता.

दीपक चहरच्या घरी सहा जण चोरी करण्यासाठी आले होते. या सहा जणांनी चोरी करण्याआधी साऱ्या शक्यतांचा अभ्यास केला होता. ते चोरी करण्यासाठी आले तेव्हा संपूर्ण इमारतीत त्याची आई एकटीच होती. या चोरांनी आधी सीसीटीव्हीचे कनेक्शन कापले. जेव्हा सीसीटीव्ही बंद झाले, त्यावेळीच काही तरी घोळ आहे. हे लक्षात येताच त्यांनी प्रसंगावधान राखत अलार्म वाजवला. परिणामी, चोरांना पकडण्यात उत्तर प्रदेश पोलिसांना यश आले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Robbery at team indias player deepak chahars house and six men arrested
First published on: 17-10-2018 at 16:05 IST