रेल्वेचा क्षेत्ररक्षक रोहन भोसले याच्या मानेवर तामिळनाडूचा फलंदाज राजागोपाल सतीश याने मारलेला चेंडू जोरात बसल्यामुळे रोहनला रुग्णालयात दाखल करावे लागले. या घटनेच्या वेळी मैदानावरील खेळाडूंना ऑस्ट्रेलियाचा दिवंगत फलंदाज फिल ह्य़ुजची आठवण झाली.
रेल्वेचा कर्णधार महेश रावतने याबाबत सांगितले, ‘‘सतीशने ताकदीनिशी मारलेला फटका शॉर्टलेगला उभ्या असलेल्या रोहनच्या मानेवर बसला. रोहनने हेल्मेट परिधान केले होते, मात्र हा चेंडू हेल्मेटखाली मानेच्या उजव्या बाजूवर आदळला. रोहन कळवळला. त्याला मैदानावर त्वरित प्राथमिक उपचार करण्यात आले व त्यानंतर लगेचच त्याला अपोलो रुग्णालयात नेण्यात आले. तो पूर्णपणे शुद्धीवर असून त्याच्या प्रकृतीला कोणताही धोका नसल्याचे रुग्णालयात उपचार करणाऱ्या तज्ज्ञांनी कळवले आहे. मात्र त्याला २४ तास वैद्यकीय तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ठेवण्यात येणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 31st Dec 2014 रोजी प्रकाशित
काळ आला होता, पण..
रेल्वेचा क्षेत्ररक्षक रोहन भोसले याच्या मानेवर तामिळनाडूचा फलंदाज राजागोपाल सतीश याने मारलेला चेंडू जोरात बसल्यामुळे रोहनला रुग्णालयात दाखल करावे लागले.

First published on: 31-12-2014 at 12:20 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohan bhosale hit on neck against tamil nadu