रोहन बोपण्णा व एहसाम उल हक कुरेशी या इंडो-पाक जोडीने दुबई ‘डय़ुटी फ्री’ टेनिस स्पर्धेतील पुरुषांच्या दुहेरीत उपांत्यपूर्व फेरी गाठली. त्यांनी निकोलाय डेव्हिडेन्को व व्हिक्टर हानेस्कु यांच्यावर ६-१, ५-७, १०-८ अशी मात केली.
द्वितीय मानांकित बोपण्णा व कुरेशी यांनी हा सामना दीड तासांत जिंकला. पहिल्या सेटमध्ये त्यांनी दोन वेळा सव्र्हिस ब्रेक मिळविला. मात्र दुसऱ्या सेटमध्ये त्यांना दोन वेळा सव्र्हिस गमवावी लागली. १-१ अशा बरोबरीमुळे सामना सुपर टायब्रेकरवर गेला. त्यामध्येही चुरस पाहावयास मिळाली. बोपण्णा व कुरेशी यांनी परतीचे फटके व सव्र्हिस यावर नियंत्रण ठेवीत हा सेट जिंकला.