टीम इंडियाने वेस्ट इंडीजला वनडे मालिकेत ३-० अशी धूळ चारली आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या तिसऱ्या वनडेत भारताने ९६ धावांनी दणदणीत विजय नोंदवला. टीम इंडियाचा पूर्णवेळ कप्तान म्हणून रोहित शर्माचा हा पहिला वनडे मालिकाविजय आहे. या विजयासह एक मोठा पराक्रम केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय संघाने पहिल्यांदाच वेस्ट इंडीजला वनडे मालिकेत व्हाइटवॉश दिला आहे. भारताने एकूण १२व्यांदा एखाद्या संघाला वनडेत व्हाइटवॉश दिला. महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहली यांनी वनडे मालिकेत कर्णधार म्हणून तीन वेळा विरोधी संघाला क्लीन स्वीप दिला आहे. याशिवाय कपिल देव, दिलीप वेंगसरकर, मोहम्मद अझरुद्दीन, गौतम गंभीर आणि अजिंक्य रहाणे यांनीही वनडे मालिकेत त्यांच्यासमोरच्या संघाला एकदा व्हाइटवॉश दिला आहे.

हेही वाचा – IND vs WI 3rd ODI : भारताचा ९६ धावांनी दणदणीत विजय; रोहितसेनेनं ३-०नं जिंकली मालिका!

या सामन्यात रोहितने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ५० षटकात भारतीय संघाचा डाव २६५ धावांवर आटोपला. आघाडीची फळी उद्ध्वस्त झाल्यानंतर श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांनी अर्धशतके ठोकली. प्रत्युत्तरात वेस्ट इंडीजचा संघ १६९ धावांपर्यंतच पोहोचू शकला. प्रसिध कृष्णा, दीपक चहर आणि मोहम्मद सिराज या भारताच्या वेगवान त्रिकुटाने जबरदस्त गोलंदाजी करत सामना भारताच्या बाजूने झुकवला. श्रेयस अय्यरला सामनावीर, तर प्रसिध कृष्णाला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit sharma become first indian captain to whitewash west indies in odi series adn
First published on: 11-02-2022 at 21:25 IST