Rajasthan Royals vs Mumbai Indians Highlights: यशस्वी जैस्वाल आपल्या उत्कृष्ट फलंदाजी कौशल्यासह आयपीएलमध्ये दुसरे शतक झळकावत सर्वांनाच प्रभावित केले आहे. सोमवारी राजस्थान विरूद्ध मुंबईमध्ये झालेल्या सामन्यात यशस्वी जैस्वालची बॅट पुन्हा एकदा चांगलीच तळपताना दिसली. राजस्थानकडून सलामीला आलेला यशस्वी १०४ धावा करत संघाला विजय मिळवून देत नाबाद परतला. आयपीएलच्या सुरूवातीपासूनच खराब फॉर्मशी झुंजत असलेल्या यशस्वीवर संघाने विश्वास दाखवला आणि जैस्वालनेही त्यांना निराश न करता थेट शतकी खेळी करून दाखवली. यशस्वीने ६० चेंडूत ९ चौकार आणि ७ षटकार ठोकले आणि १७३.३३ च्या स्ट्राईक रेटने नाबाद १०४ धावा केल्या. या शतकी खेळीसह त्याने आयपीएलमध्ये एक ऐतिहासिक कामगिरी नावे केली आहे.

आयपीएलमध्ये दोन शतके झळकावणारा यशस्वी जैस्वाल हा सर्वात तरुण फलंदाज ठरला आहे. वयाची २३ वर्षे पूर्ण होण्याआधीच यशस्वीने सर्वात कमी वयात दोन शतके झळकावण्याचा पराक्रम केला आहे. यशस्वीचे वय २२ वर्षे ११६ दिवस इतके आहे. या वयापर्यंत त्याने आयपीएलमध्ये दोन शतके झळकावली आहेत. आयपीएलमध्ये एवढ्या कमी वयात ही कामगिरी एकाही फलंदाजाला करता आलेली नाही. यशस्वीने हा दुर्मिळ विक्रम आपल्या नावावर केला आहे.

Arshdeep Singh to pick a wicket on the first ball of a T20 WC 2024 Match against USA
IND vs USA : अर्शदीप सिंगने रचला इतिहास! आतापर्यंत कोणत्याच भारतीय गोलंदाजाला न जमलेला केला पराक्रम
Rohit Sharma breaks Dhoni's record
IND vs IRE : रोहित शर्माने धोनीला मागे टाकत रचला इतिहास! ‘हा’ मोठा पराक्रम करणारा ठरला पहिलाच कर्णधार
KKR won the trophy and became joint first with RR
KKR vs SRH : ट्रॉफी जिंकण्यासोबत केकेआरचा मोठा पराक्रम, IPL च्या इतिहासात दुसऱ्यांदाच पाहायला मिळाला ‘हा’ विक्रम
Virat Needs 29 runs to reach 8000 runs complete in IPL history
RR vs RCB : एलिमिनेटर सामन्यात विराट इतिहास रचण्यासाठी सज्ज! IPL मध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरणार पहिलाच खेळाडू
Abhishek Sharma smashed Virat Kohli's record of most sixes in single season
SRH vs PBKS : अभिषेक शर्माने विराटचा विक्रम मोडत रचला इतिहास, ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय
Royal Challengers Bengaluru beat Chennai Super Kings by 27 runs
IPL 2024 : RCB ने प्लेऑफ्ससाठी पात्र ठरून रचला इतिहास, आयपीएलमध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला संघ
Virat Kohli Completed 3000 Runs at Chinnaswamy
RCB vs CSK: विराट कोहलीने चिन्नास्वामी स्टेडियमवर रचला इतिहास, IPL मध्ये ‘या’ दोन कामगिरी करणारा ठरला पहिला फलंदाज
Riyan Parag complete 500 runs in IPL 2024
RR vs PBKS : २२ वर्षीय रियान परागचा मोठा पराक्रम! मिचेल मार्श आणि सूर्यकुमार यादवच्या खास क्लबमध्ये झाला सामील

राजस्थानच्या घरच्या मैदानावरील शतकापूर्वी यशस्वीने गेल्या वर्षी वानखेडेवर शतक झळकावले होते. योगायोगाने त्याचे पहिले शतकही मुंबई इंडियन्सविरुद्धचं होते. त्यावेळी त्याचे वय अवघे २१ वर्षे १२३ दिवस होते. तर आता दुसरे शतकही त्याने मुंबई इंडियन्सविरूद्धच झळकावले आहे.

यशस्वी आयपीएल सुरू झाल्यापासून खराब फॉर्ममध्ये होता, पण त्याने मुंबईविरुद्धच्या सामन्यात पुनरागमन करत आपली लय परत मिळवली आणि संघाला ८ चेंडू बाकी असताना ९ गडी राखून नेत्रदीपक विजय मिळवून दिला. कमी वयात अनेक विक्रम आपले नावे करू पाहणाऱ्या यशस्वीचे हे तिसरे आंतरराष्ट्रीय टी-२० शतक आहे. जैस्वालने चीनमधील हांगझोऊ येथे खेळल्या गेलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत नेपाळविरुद्ध शानदार शतक झळकावले होते. त्याने २०४ च्या स्ट्राईक रेटने ४९ चेंडूत ८ चौकार आणि ७ षटकारांसह शतक पूर्ण केले.