भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना गुरुवारपासून खेळला जात आहे. हा पहिला सामना नागपुरात खेळला जातोय. ऑस्ट्रेलियाचा संघाचा पहिला डाव १७७ धावांवर आटोपला. दरम्यान या सामन्यातील रोहित शर्माचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये तो टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजचे उष्टं पाणी पिताना दिसत आहे.

एका यूजरने मोहम्मद सिराजचे उष्टं पाणी पितानाचा रोहित शर्माचा हृदयस्पर्शी व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. जो काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओ ऑस्ट्रेलियाच्या डावाच्या १०व्या षटकानंतर ड्रिंक्स ब्रेकचा आहे. ड्रिंक्स ब्रेक दरम्यान जयदेव उनाडकट पाण्याची बाटली घेऊन मैदानात येतो. मोहम्मद सिराज ज्या बाटलीतून पाणी पितो, त्याच बाटलीतून रोहित शर्माही पाणी पिताना दिसत आहे.

हा व्हिडिओ भारतीय संघातील खेळाडूंचे एकमेकांसोबत असलेले संबंध दर्शवतो. भारत असा देश आहे, जिथे प्रत्येक धर्म, प्रत्येक जाती-पंथाच्या लोकांमध्ये प्रेम आहे. दुसरीकडे, सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ६३.५ षटकांत १७७ धावांवर गारद झाला.

हेही वाचा – IND vs AUS 1st Test: जडेजा-आश्विनच्या फिरकीपुढे कांगांरू ठरले निष्प्रभ, १७७ धावांत पहिला डाव आटोपला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक धावा मार्नस लाबुशेनने केल्या. त्याने ४९ धावांचे योगदान दिले. तसेच भारताकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर आर आश्विनने प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. तसेच सिराज आणि शमीने प्रत्येकी एक विकेट घेतली.