Rohit Sharma Press Conference Ahead Of WTC Final 2023 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलआधी रोहित शर्माने माध्यमांशी संवाद साधला आणि टीम इंडियाच्या तयारीबाबत प्रतिक्रिया दिली. कर्णधार म्हणून मी एक किंवा दोन आयसीसी ट्रॉफी नक्कीच जिंकायची इच्छा आहे. टीम इंडियाच्या प्लेईंग ११ बाबत आम्ही उद्या निर्णय घेऊ. खेळपट्टीला पाहिल्यावरच निर्णय घेतला जाऊ शकतो. येथील खेळपट्टी प्रत्येक दिवशी बदलत असते. अशातच सर्व १५ खेळाडूंना तयार राहावं लागेल. सर्व खेळाडू महत्वाचे आहेत आणि अंतिम निर्णय सामन्याच्या दिवशीच घेतला जाईल, असं रोहित शर्माने माध्यमांशी बोलताना म्हटलं.

रोहित पुढे म्हणाला, मला भारतीय क्रिकेट संघाला पुढे नेण्याचा आणि जास्तीत जास्त सामने आणि चॅम्पियनशिप जिंकवून देण्याचं काम मिळालं आहे. तुम्ही यासाठीच खेळत असता. काही किताब आणि महत्वाच्या मालिका जिंकण्यासाठी जोरदार प्रयत्न करत असतो. आम्ही इथे जिंकण्यासाठी आलो आहोत आणि आम्ही शर्थीचे प्रयत्न करत राहू. गिलबाबत विचारलेल्या प्रश्नावर रोहित म्हणाला, गिलला कोणत्याही प्रकारचा सल्ला देण्याची गरज नाहीय. तो नेहमीच चांगली कामगिरी करत आहे. आयपीएलमध्ये त्याने मोठी खेळी केली आहे. या फायनलच्या सामन्यातही तो चांगला खेळ खेळेल, अशी अपेक्षा आहे.

नक्की वाचा – WTC Final : भारताविरुद्ध ‘अशी’ असेल ऑस्ट्रेलियाची प्लेईंग ११, कर्णधार पॅट कमिन्स म्हणाला, “वेगवान गोलंदाज…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारतीय क्रिकेट संघ सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचला आहे. मागील सामन्यात कोहलीच्या नेतृत्वात भारताचा न्यूझीलंडविरोधात ८ विकेट्सने पराभव झाला होता. यावेळी भारतीय संघ जुन्या चूका विसरून किताब जिंकण्याचा प्रयत्न करेल. १० वर्षांपासून भारतीय क्रिकेट संघाला आयसीसी ट्रॉफीचं जेतेपद मिळालं नाहीय.