टी २० वर्ल्डकपमध्ये रोहित शर्मा सुरूवाचीच्या दोन सामन्यात अपयशी ठरला. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात त्याला भोपळाही फोडता आला नाही. तर न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात विशेष काही करू शकला नाही. मात्र अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात त्याची बॅट चांगलीच तळपली. त्याने अर्धशतकी खेळी केली आणि भारताला मोठी धावसंख्या उभारून दिली. सलामीचा फलंदाज रोहित शर्मा भारताचा दिग्गज क्रिकेटपटू आहे. रोहित शर्माने २००७ पासून आतापर्यंत क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात आपल्या फलंदाजीने नावलौकिक मिळवला आहे. भारताचा उपकर्णधार रोहित शर्माने आयसीसी बोलताना आपल्या ४५ नंबरच्या जर्सीचा खुलासा केला आहे. रोहित शर्मा टीम इंडियाचा सदस्य झाल्यापासूनच ४५ नंबरची जर्सी परिधान करत आहे.

“४५ नंबरची जर्सी घालण्यामागे काही खास कारण नाही. माझ्या आईला हा नंबर आवडला म्हणून मी नंबरची जर्सी घालत आहे. भारतीय संघात आल्यांतर मला खूप सारे नंबर दाखवले गेले. त्यानंतर मी आईला विचारलं कोणता नंबर घेऊ? तेव्हा आई बोलली ४५ नंबर चांगला आहे, तो घे.”, असं रोहित शर्माने सांगितलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माने ४७ चेंडूत ७४ धावांची खेळी केली. या खेळीत ८ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश आहे. रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी पुन्हा एकदा शतकी भागीदारी करत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. आंतरराष्ट्रीय टी २० क्रिकेटमध्ये या जोडीची चौथी शतकी भागीदारी आहे. यासह त्यांनी दुसऱ्या नंबरवर असलेल्या जोडीची बरोबरी केली आहे. विशेष म्हण्जे दोन्ही जागेवर रोहित शर्माचं नाव आहे. रोहित शर्माने शिखर धवनसोबत शतकी भागीदारी केली होती.रोहित शर्माने वर्ल्डकप इतिहासात सर्वाधिक ५० हून अधिक धावा करण्याऱ्या श्रीलंकेच्या माजी क्रिकेटपटू महेला जयवर्धनेच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. रोहित शर्माने टी २० विश्वचषकात सात वेळा ५० हून अधिक धावा केल्या आहेत. तर विराट कोहलीने १० वेळा आणि ख्रिस गेलने ९ वेळा ५० हून अधिक धावा केल्या आहेत.