Team India Instagram Live : भारतीय क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडीज दौऱ्यावर आहे. ज्या खेळाडूंची टी २० संघात वर्णी लागली आहे ते देखील दोन दिवसांपूर्वीच कॅरेबियन बेटांवर दाखल झाले आहेत. खूप दिवसांनी एकत्र आलेल्या खेळाडूंनी प्रत्यक्ष न भेटता डिजीटल पद्धतीने एकमेकांशी गप्पा मारल्या आहेत. कर्णधार रोहित शर्मा, ऋषभ पंत आणि सूर्यकुमार यादवने एकत्र येऊन इन्स्टाग्राम लाइव्हमध्ये युझवेंद्र चहलची मनसोक्त चेष्टा केली. गंमत म्हणजे या लाइव्हमध्ये ते कोणत्याही चाहत्याला सामील करून घेत होते. यादरम्यान माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि ईशांत शर्मादेखील काहीक्षण या लाइव्हमध्ये दिसले.

मंगळवारी (२६ जुलै) रात्री कर्णधार रोहित शर्मा, ऋषभ पंत आणि सूर्यकुमार यादव हे मस्तीच्या मूडमध्ये दिसले. त्यांनी इन्स्टाग्राम लाइव्ह करून युझवेंद्र चहलची जोरदार खिल्ली उडवली. विशेष म्हणजे हे सर्व खेळाडू एकाच हॉटेलमध्ये असूनही त्यांनी आपापल्या खोलीत बसून एकमेकांवर विनोद केले. या लाइव्ह सेशनच्या काही चित्रफिती सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. क्रिकेटपटूंमधील मजामस्ती बघून चाहत्यांच्याही आनंदाला पारावर राहिला नाही. एका चाहत्याने या लाइव्हचा व्हिडीओ रेकॉर्ड करून युट्युबला अपलोड केला आहे.

लाइव्ह दरम्यान रोहित शर्माने युझवेंद्र चहलला मंगळवारी सकाळी नाश्त्यासाठी न आल्याबद्दल जाब विचारला. शिवाय रोहितने पंतकडे चहलला लाइव्हमधून काढून टाकण्याची मागणीही केली. अर्थात ही मागणी गमतीचा एक भाग होती. सुमारे ४० मिनिटे चाललेल्या या गप्पागोष्टींमध्ये ऋषभ पंतने काही चाहत्यांना देखील त्यात समाविष्ट करून घेतले. आयपीएल फ्रँचायझी राजस्थान रॉयल्सने याबाबत एक ट्वीटही केले आहे.

हेही वाचा – Video : रोहित शर्मा अन् ऋषभ पंतसह इतर खेळाडू वेस्ट इंडीजमध्ये दाखल; हॉटेलच्या लॉबीमध्ये रंगला गळाभेटीचा कार्यक्रम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारतीय क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडीजसोबत एकदिवसीय मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून भारताने २-० अशी विजयी आघाडी घेतलेली आहे. या मालिकेनंतर दोन्ही संघ पाच सामन्यांची टी २० मालिका खेळणार आहेत.