Rohit Sharma Stand Reveal Ceremony Wankhede Stadium Video: मुंबईचा राजा रोहित शर्माच्या नावाचं स्टँन्ड आता मुंबईतील आयकॉनिक वानखेडे स्टेडियमवर यापुढे पाहायला मिळणार आहे. रोहित शर्माच्या नावाच्या स्टँन्डचं वानखेडेच्या मैदानावर अनावरण करण्यात आलं. वानखेडे स्टेडियममध्ये आज म्हणजेच १६ मे रोजी मुंबई क्रिकेट असोसिएशनने चार नव्या स्टँन्डच्या अनावरणाचा भव्यदिव्य कार्यक्रम आयोजित केला आहे.
रोहित शर्मा आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्या संपूर्ण कुटुंबासह पोहोचला होता. रोहित शर्माचे आई-बाबा त्याची पत्नी रितिका सजदेह, भाऊ आणि त्याची पत्नी असे सारं कुटुंब या ऐतिहासक क्षणासाठी उपस्थित होते. रोहित शर्माचे आई-वडिल आणि त्याची पत्नी या त्याच्या नावाच्या स्टँन्डचं अनावरण करण्यासाठी स्टेजवर उपस्थित होते. रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेहला यादरम्यान अश्रू अनावर झाले होते. मुंबई क्रिकेट असोसिएशनने या खास क्षणाचा व्हीडिओ शेअर केला आहे.
रोहित शर्माने नुकतीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. रोहित शर्माने भारताच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये नेतृत्त्व केले आहे. रोहित शर्माच्या स्टँन्डजवळ त्याचे कसोटी क्रिकेटमधील जर्सीचा फोटो तिथे होता. मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघही या कार्यक्रमासाठी उपस्थित होता. रोहित शर्मा वानखेडेच्या या मैदानावरच क्रिकेट खेळत मोठा झाला. या स्टँन्डच्या अनावरणावेळी रोहित शर्माने भावना शब्दात व्यक्त करता येणार नाहीत, असे म्हटले होते.
सर्वात आधी शरद पवारांचं नाव दिलेल्या स्टँन्डचं अनावरण करण्यात आलं. अजित वाडेकरांच्या कुटुंबाने त्यांच्या नावाच्या स्टँन्डचे अनावरण केले. अजित वाडेकर जे भारताच्या वनडे संघाचे पहिले कर्णधार होते. ज्यांनी भारतबाहेर टीम इंडियाला पहिला मालिका विजय मिळवून दिला होता. यानंतर मुंबई क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष अमोल काळे यांच्या स्मृती प्रीत्यर्थ ऑफिस लाँजला त्यांचे नाव दिले.