IND vs SL Rohit Sharma Statement on Tied Match: भारतीय संघ टी-२० मालिकेनंतर आता श्रीलंकेविरूद्ध एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिला सामना टाय झाला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेच्या संघाने २३० धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघही केवळ २३० धावा करू शकला. भारतीय संघ हा सामना केवळ १ धावाने जिंकू शकला नाही. याच दरम्यान सामना झाल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा खूपच निराश दिसत होता. सामन्यानंतर टीम इंडियाच्या कर्णधाराने कबूल केले की, श्रीलंकेविरुद्धचा पहिला वनडे सामना जिंकण्यासाठी संघाने १४ चेंडूत एक धाव काढायला हवी होती.

हेही वाचा – Rohit Sharma: हिटमॅन नंबर वन! रोहित शर्माने रचला मोठा विक्रम, ‘ही’ कामगिरी करणारा जगातील पहिला कर्णधार

Bangladesh Captain Big Statement Ahead of IND vs BAN test Series
IND vs BAN: “ते क्रमवारीत पुढे असले तरी…”, कसोटी मालिकेआधी बांगलादेशच्या कर्णधाराचं भारतीय संघाला आव्हान, नेमकं काय म्हणाला?
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
PAK vs BAN Test Series Yasir Arafat on PCB
PAK vs BAN : पीसीबी म्हणजे एक सर्कस, त्यात अनेक जोकर भरलेत; माजी खेळाडूची कठोर शब्दात टीका
Pakistan Creates Unwanted Record Becomes 2nd Team to Lose 20 Consecutive Test Matches At Home
PAK vs BAN: पाकिस्तानच्या नावे कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील लाजिरवाणा रेकॉर्ड, घरच्या मैदानावरचं केला नकोसा विक्रम
Najmul Shanto on Team India
Najmul Shanto : बांगलादेशच्या कर्णधाराचे ऐतिहासिक विजयानंतर मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘भारताविरुद्ध पण आम्ही…’
Icc test rankings updates in marathi
Test Rankings : ICC ची ताजी कसोटी क्रमवारी जाहीर! यशस्वी जैस्वालला फायदा तर बाबर आझमला बसला मोठा फटका
World Test Championship 2025 How Pakistan Qualify for Final Match
PAK vs BAN: बांगलादेशकडून पराभूत झाल्यानंतरही पाकिस्तान WTC फायनलमध्ये पोहोचू शकतो? काय आहे समीकरण?
PAK vs BAN Mohammed Rizwan Broke Rishabh Pant and Andy Flower Record
PAK vs BAN: मोहम्मद रिझवानने मोडला ऋषभ पंतचा विक्रम, पराभूत कसोटी सामन्यात ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला पाकिस्तानी यष्टिरक्षक

IND vs SL: भारताचा सामना टाय झाल्याने निराश रोहित शर्मा काय म्हणाला?

श्रीलंकेने दिलेल्या २३१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ ४७.५ षटकांत रोहितच्या ५८ धावांच्या वेगवान खेळीनंतरही २३० धावांवर सर्वबाद झाला. श्रीलंकेच्या चार फिरकीपटूंविरुद्ध भारतीय खेळाडू धावा करण्यात अपयशी ठरले. सामन्यानंतर कर्णधार रोहित म्हणाला, ‘हे लक्ष्य गाठता आलं असतं. मात्र यासाठी तुम्हाला चांगली फलंदाजी करावी लागेल. आम्ही काही ठिकाणी चांगली फलंदाजी केली पण संपूर्ण सामन्यात ती लय कायम ठेवू शकलो नाही. आम्ही चांगली सुरुवात केली, पण १० षटकांनंतर फिरकी गोलंदाज आल्यावर खरा सामना सुरू होईल हे आम्हाला माहित होतं. आम्ही काही विकेट गमावल्या आणि सामन्यात मागे पडलो.”

हेही वाचा – Paris Olympic 2024: भारताच्या हॉकी संघाने ऑस्ट्रेलियाला पराभूत करत रचला इतिहास, ऐतिहासिक विजयासह ५२ वर्षांचा दुष्काळ संपव

१४ बॉलमध्ये १ रन काढता आली नाही आणि हरलो हे निराशाजनक-रोहित

पुढे रोहित म्हणाला, “अक्षर पटेल आणि केएल राहुल यांच्या भागीदारीने आम्ही पुनरागमन केले, पण ते दोघेही बाद झाल्याने पुन्हा संतुलन बिघडलं. शेवटी १४ चेंडूत एकही धाव काढता आली नाही हे निराशाजनक आहे. मी फार काही बोलणार नाही. अशा गोष्टी घडतात. श्रीलंकेच्या संघाने चांगली कामगिरी केली.”

खेळपट्टीच्या प्रश्नावर रोहित म्हणाला – “ही खेळपट्टी आम्ही जशी विचार केली होती तशीच होती. आम्ही गोलंदाजी केली तेव्हा पहिल्या २५ षटकांमध्ये जशी खेळपट्टी होती तशीच आम्ही फलंदाजी करतानाही होती. जसजसा खेळ पुढे सरकत गेला तसतशी फलंदाजी थोडी सोपी झाली.”

हेही वाचा – Paris Olympic 2024: कष्टाचं चीज झालं! ९ वर्षांपासून रखडलेली बढती, स्वप्नील कुसाळेने ऑलिम्पिक पदक जिंकताच रेल्वेला आली जाग; दिलं मोठं गिफ्ट

खराब शॉट्स खेळून बाद झाल्याबद्दल बोलताना रोहित म्हणाला, “या खेळपट्टीवर फक्त येऊन तुमचे शॉट्स खेळाल आणि धावा होतील अशी नव्हती. ते लक्ष्य गाठण्यासाठी तुम्हाला मैदानात स्वतला सेट करून पाय रोवून उभं राहावं लागतं. कायम राहावं लागेल आणि खरोखर चांगले खोदून घ्यावे लागेल. आम्ही शेवटपर्यंत ज्या प्रकारे खेळलो त्याचा अभिमान आहे. सामना वेगवेगळ्या वेळी दोन्ही संघांच्या बाजूने वळला. खेळात टिकून राहणे महत्त्वाचे होते. पण ती एक धाव आम्ही काढायला हवी होती.”

टीम इंडियाची फलंदाजी बाजू

पहिल्या वनडे सामन्यात टीम इंडियाची फलंदाजी फ्लॉप ठरली. शुभमन गिल १६ धावांवर बाद झाल्यानंतर रोहित ५८ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. विराट कोहलीनेही निराश केले, त्याने ३२ चेंडूत २४ धावा केल्या. वॉशिंग्टन सुंदर ५, श्रेयस अय्यर २३, केएल राहुल ३१, अक्षर पटेल ३३ आणि कुलदीप यादव २ धावा करून बाद झाले. शिवम दुबेने शेवटपर्यंत झुंज दिली. त्याने २४ चेंडूत १ चौकार आणि २ षटकार लगावत २५ धावा केल्या. मोहम्मद सिराजने ११ चेंडूत ५ धावा करत नाबाद राहिला. तर अर्शदीप सिंग एकही धाव न काढता बाद झाला. अर्शदीपने एक धाव घेतली असती तर टीम इंडियाने विजय मिळवला असता, पण तसे होऊ शकले नाही.