Rohit Sharma Takes Blessing of Ganpati Bappa in worli Video: भारताचा वनडे कर्णधार रोहित शर्मा गणपतीच्या दर्शनासाठी हजेरी लावल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. सध्या मुंबईतील मोठमोठे गणपती पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. यादरम्यान रोहित शर्माने देखील वरळीमध्ये गणपतीच्या दर्शनासाठी हजेरी लावली होती. चाहत्यांनी रोहितची एक झलक पाहण्यासाठी गर्दी केली होती, तर हिटमॅनच्या कारभोवती देखील चाहत्यांनी गराडा घातला होता. याचे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
अनंत चतुर्दशीच्या दोन दिवस आधी म्हणजेच ४ सप्टेंबरला हिटमॅनने वरळीमधील मुंबई पोलीसच्या राजाचं दर्शन घेतलं. रोहितदेखील वरळीमध्येच राहतो. रोहित शर्माने वरळीमध्ये गणपती बाप्पाच्या दर्शनाला हजेरी लावली होती. याठिकाणी रोहितला पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती.
भारताचा वनडे कर्णधार रोहित शर्मा गणपतीच्या दर्शनासाठी हजेरी लावल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. सध्या मुंबईतील मोठमोठे गणपती पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. यादरम्यान रोहित शर्माने देखील वरळीमध्ये गणपतीच्या दर्शनासाठी हजेरी लावली होती. चाहत्यांनी रोहितची एक झलक पाहण्यासाठी गर्दी केली होती, तर हिटमॅनच्या कारभोवती देखील चाहत्यांनी गराडा घातला होता. याचे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
अनंत चतुर्दशीच्या दोन दिवस आधी हिटमॅनने वरळीमधील मुंबई पोलीसच्या राजाचं दर्शन घेतलं. रोहितदेखील वरळीमध्येच राहतो. रोहितला पाहण्यासाठी चाहत्यांनी मंडपात आणि मंडपाबाहेर तुफान गर्दी केली होती. हिटमॅन निळ्या रंगाचं टीशर्ट आणि जीन्स घालून दर्शनासाठी पोहोचला होता. त्याच्या मैदानावरील कामगिरीसह हिटमॅनचा हाच साधेपणा चाहत्यांना प्रचंड भावतो.
रोहितने मुंबई पोलीसच्या मंडपात बाप्पासमोर बसत डोक टेकवून आशीर्वाद घेतले. रोहितचा बाप्पाचा आशीर्वाद घेतानाचा हा व्हिडीओदेखील व्हायरल होत आहे. रोहितला आशीर्वाद घेताना पाहून चाहत्यांनी बाप्पाकडे हिटमॅनला २०२७ चा वर्ल्डकप खेळण्याचे आणि जिंकण्याचे बळ दे, असं सांगत आहेत.
यानंतर रोहित मंडपाबाहेर जायला निघताना त्याला पाहण्यासाठी चाहत्यांची आधीच गर्दी झाली होती. पण रोहितला काही त्रास होऊ नये याची मंडळातील कार्यकर्ते तसेच पोलिसांनी काळजी घेतली. कारमध्ये बसल्यानंतर रोहितने रुफटॉप ऑन करत चाहत्यांना हात दाखवला. तितक्यात चाहत्यांनी ‘मुंबईचा राजं रोहित शर्मा’ अशा घोषणा दिल्या आणि एकच जल्लोष केला. रोहितने देखील चाहत्यांना निरोप देत तिथून निघाला.