भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) शनिवारी (१९ फेब्रुवारी) रोहित शर्माची भारतीय कसोटी संघाचा स्थायी कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर विराट कोहलीने कसोटी संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर रोहितकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यापूर्वी रोहितकडे मर्यादित षटकांचे कर्णधारपद देण्यात आले होते. आता रोहित तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.

मैदानावर सक्रिय असण्यासोबतच रोहित शर्मा सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. त्याला वेळ मिळेल तेव्हा तो ट्विटरवर त्याच्या चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे देतो. आता रोहितने सप्टेंबर २०१८ मध्ये केलेले एक ट्वीट खूप व्हायरल होत आहे. त्यादरम्यान एका चाहत्याने त्याला तुझ्या व्यक्तिमत्त्वाचे वर्णन करणारे कोट देण्यास सांगितले होते, ज्याला रोहितने उत्तर दिले आणि लिहिले, ““Throw me to the wolves and I come back leading the pack.”

Virat Kohli And Umpire Argument Video
KKR vs RCB : आऊट दिल्यानंतर विराट कोहली संतापला, अंपायरशी वाद घालतानाचा VIDEO व्हायरल
Confirmed Rohit Sharma does not stay with Mumbai Indians team in Mumbai
रोहित शर्माने सांगितलं मुंबई इंडियन्सच्या संघासह न राहण्याचं कारण; म्हणाला, “आता माझ्या हातात तर..”
australia church stabbing
ऑस्ट्रेलियामध्ये पुन्हा एकदा चाकूहल्ला; यावेळी चर्चमध्ये प्रार्थना सुरू असताना माथेफिरूचा हल्ला
Rohit breaks Dhoni's sixes record
IPL 2024 MI vs DC : रोहित शर्माने मोडला धोनीचा विक्रम! वॉर्नर-कोहलीच्या ‘या’ खास क्लबमध्येही झाला सामील
रोहित शर्माचं जुनं ट्वीट

हेही वाचा – रहाणे, पुजाराला वगळले; साहा, इशांतलाही डच्चू; श्रीलंकेविरुद्धच्या मालिकांसाठी संघ जाहीर

विराट कोहलीच्या अनुपस्थितीत रोहितने अनेक वेळा भारताच्या टी-२० आणि एकदिवसीय संघांचे नेतृत्व केले आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आशिया चषक जिंकला आहे. आत्तापर्यंत रोहितने २४ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले असून यापैकी भारताने २० सामने जिंकले आहेत. त्याचप्रमाणे, एकदिवसीय सामन्यांमध्येही भारताने रोहितच्या नेतृत्वाखाली १३ पैकी ११ सामने जिंकले आहेत.