Ruturaj Gaikwad Press Conference : भारत आणि आर्यलँड यांच्यात तीन टी-20 सामन्यांची मालिका सुरु असून ऋतुराज गायकवाड टीम इंडियाचं नेतृत्व करत आहे. आयपीएलमध्ये धावांचा पाऊस पाडणाऱ्या ऋतुराजला भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य संघात स्थान मिळालं नाही. याबाबत खुद्द ऋतुराज गायकवाडने स्पष्टीकरण दिलं आहे. मुख्य संघात तुम्हाला जागा मिळत नाही आणि अशाप्रकारच्या टूरलाच तुम्ही खेळू शकता, या गोष्टींचा तुम्हाला स्विकार करावा लागतो, असं विधान ऋतुराजने केलं आहे. आर्यलँड विरुद्ध झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यानंतर ऋतुराजने पत्रकार परिषदेत याबाबत मोठी प्रतिक्रिया दिली.
पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधताना ऋतुराज गायकवाड म्हणाला, आर्यलॅंड विरुद्ध सुरु असलेली मालिका माझ्यासाठी खूप महत्वाची आहे. जेव्हा तुम्ही पहिल्या सामन्यापासूनच मालिका खेळत असता, त्यामुळे खूप गोष्टींमध्ये फरक पडतो. तुम्ही खूप आत्मविश्वासाने येता आणि तुमची तयारीही खूप चांगली झालेली असते. तसंच तुमचा माइंडसेटही चांगला असतो. परंतु, अनेकदा तुम्हाला या गोष्टी स्विकाराव्या लागतात की, मुख्य संघाता कोणतीही जागा नाही. अनेक फलंदाज असे आहेत, जे आधीपासूनच खूप चांगली कामगिरी करत आहेत. आणि ही खूप संमिश्र पद्धतीची फिलिंग आहे.
ऋतुराज गायकवाडने आर्यलँड विरोधाता झालेल्या दुसऱ्या सामन्यात अप्रतिम फलंदाजी केली. गायकवाडने 43 चेंडूत 6 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 58 धावा केल्या. भारतीय संघासाठी त्याने सर्वात जास्त धावा केल्या. यावरून स्पष्ट होतं की, तो फॉर्ममध्ये आला आहे. ऋतुराजला एशियन गेम्स 2023 साठी भारतीय संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आला आहे. ऋतुराजने 2021 मध्ये श्रीलंका टूरवर टीम इंडिसाठी पदार्पण केलं होतं. त्यानंतर त्याला अधूनमधून संधी मिळत होती. आतापर्यंत त्याने दोन वनडे आणि 11 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.