विजय हजारे करंडक २०२२ स्पर्धेतील दुसरा उपांत्य सामना महाराष्ट्र विरुद्ध आसाम संघात खेळला जात आहे. या सामन्यात कर्णधार ऋतुराज गायकवाड आपली धावांची भूख कायम ठेवली आहे. त्याने या स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यातही चमकदार कामगिरी केली आहे. गायकवाडने आसामविरुद्ध शतक झळकावले आहे. ऋतुराज गायकवाडने १२६ चेंडूत १६८ धावा केल्या. त्यामुळे महाराष्ट्र संघाने आसाम समोर ३५१ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

याआधी त्याने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात उत्तर प्रदेशविरुद्ध एका षटकात चेंडूत ७ षटकार मारून इतिहास रचला होता. अशी कामगिरी करणारा तो जगातील एकमेव खेळाडू ठरला. त्यानंतर त्याने आपल्या संघाला उपांत्य फेरीत पोहोचवले.आजच्या सामन्यात महाराष्ट्र संघाने ऋतुराज गायकवाडच्या शतकाच्या जोरावर ७ बाद ३५० धावा केल्या आहेत. त्याचबरोबर आसाम संघासमोर ३५१ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

Dinesh Karthik Says I won't be surprised if he crosses the 300 run mark in IPL
IPL 2024 : आयपीएलमध्ये लवकरच ३०० धावांचा टप्पा पार होणार, ‘या’ दिग्गज खेळाडूची मोठी भविष्यवाणी
Tilak Second player to hit 50 sixes in IPL at 21
PBKS vs MI : तिलक वर्माचा IPL मध्ये मोठा पराक्रम, ऋषभ पंतनंतर ‘ही’ कामगिरी करणारा ठरला दुसरा खेळाडू
Top 5 Oldest Player To Score A Century In IPL
IPL 2024 : रोहित शर्मासह ‘या’ पाच सर्वात वयस्कर खेळाडूंनी आयपीएलमध्ये झळकावलयं शतक, जाणून घ्या कोण आहेत?
Yuzvendra Chahal become third highest wicket taker for Rajasthan Royals
IPL 2024 : युजवेंद्र चहलने मोडला शेन वॉर्नचा विक्रम, राजस्थानसाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला तिसरा गोलंदाज

गायकवाडने अवघ्या ८८ चेंडूत हा पराक्रम केला आहे. त्याने ८८ चेंडूंचा सामना करत आपले शतक पूर्ण केले. यासोबतच त्याने ३ षटकार आणि ११ चौकारही लगावले . याचा अर्थ असा की त्याने 30 पेक्षा जास्त वेळा आणि 50 पेक्षा अधिक धावांच्या उत्कृष्ट खेळी केल्या आहेत. हा त्याचा ७१वा लिस्ट ए सामना आहे, ज्यामध्ये त्याची सरासरी ५९ आहे तर स्ट्राइक रेट १०१ आहे. ३५० हून अधिक चौकारांव्यतिरिक्त, तो १०० हून अधिक षटकार लगावणारा खेळाडू बनला आहे. त्याचप्रमाणे त्याचा टी-२० रेकॉर्ड देखील खूप प्रभावी आहे.

महाराष्ट्राच्या या फलंदाजाने उपांत्यपूर्व फेरीत उत्तर प्रदेशविरुद्ध नाबाद २२० धावांची खेळी केली. जी त्याच्या लिस्ट ए क्रिकेट कारकिर्दीतील सर्वात मोठी खेळी होती. या खेळीत त्याने १६ षटकारही लगावले होते.

ऋतुराज गायकवाडची टी-२० कारकिर्द –

हेही वाचा – IND vs NZ 3rd ODI: श्रेयस अय्यरने रचले अनेक विक्रम; ३४ वर्षांनंतर केला ‘हा’ नकोसा पराक्रम, घ्या जाणून

ऋतुराज गायकवाडच्या टी-२० कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने ९० सामन्यात ८८ डावात ३५ च्या सरासरीने २८३६ धावा केल्या आहेत. यासोबतच ३ शतके आणि २० अर्धशतकही झळकावली आहेत. यादरम्यान त्याने १३४ च्या स्ट्राईक रेटसह ११४ धावांची सर्वात मोठी खेळी केली आहे. गायकवाड हा आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्ज संघाचा भाग असून संघाला चॅम्पियन बनवण्यातही त्याची महत्त्वाची भूमिका आहे. त्याने भारतासाठी एक वनडे आणि ९ टी-२० सामनेही खेळले आहेत.