Premium

ऋतुराज गायकवाडची लगीनघाई! मेहेंदीच्या खास डिझाइनने वेधलं लक्ष, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Rururaj Gaikwad Marriage : ऋतुराज गायकवाडच्या मेहेंदीचे फोटो व्हायरल

ruturaj-gaikwad-mehendi
ऋतुराज गायकवाडच्या मेहेंदीचे फोटो व्हायरल. (फोटो : लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Rururaj Gaikwad Marriage : भारताचा स्टार क्रिकेटर व आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून उत्तम कामगिरी करणारा पुण्याचा ऋतुराज गायकवाड लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरल्यानंतर ऋतुराजने होणाऱ्या पत्नीबरोबरचा फोटो शेअर केला होता. तेव्हापासून त्याच्या लग्नाच्या चर्चा रंगल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऋतुराज उत्कर्षा पवार हिच्याबरोबर लग्नगाठ बांधणार आहे. ३ जूनला ऋतुराज व उत्कर्षा विवाहबंधनात अडकणार आहेत. त्यांच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरूवात झाली आहे. नुकताच ऋतुराज व उत्कर्षाचा मेहेंदी सोहळा पार पडला. त्यांच्या मेहेंदी सोहळ्याचे फोटो आता समोर आले आहेत. फिलमवाला या इन्स्टाग्राम पेजवरुन ऋतुराजच्या मेहेंदी सोहळ्याचे फोटो शेअर करण्यात आले आहेत.

हेही वाचा>> Ruturaj Gaikwad Marriage : ऋतुराज गायकवाडच्या होणाऱ्या पत्नीचे नाव आले समोर, जाणून घ्या तिच्याबद्दल…

ऋतुराजने हातावर उत्कर्षाच्या नावाची मेहेंदी काढल्याचं फोटोत पाहायला मिळत आहे. ऋतुराजच्या हातावर काढलेल्या मेहेंदीचं डिजाइनही खास आहे. त्याच्या एका हातावर लग्नाची तारीख लिहिण्यात आली आहे. तर दुसऱ्या हातावर दोघांच्याही नावाचे इंग्रजीतील पहिले अक्षर घेऊन बॅट व बॉलचं उत्कृष्ट डिझाइन काढण्यात आलं आहे. ऋतुराजच्या या मेहेंदीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

कोण आहे ऋतुराजची होणारी पत्नी?

ऋतुराजच्या होणाऱ्या पत्नीचं नाव उत्कर्षा पवार असं आहे. उत्कर्षादेखील एक क्रिकेटपटू आहे. तिचा जन्म १३ ऑक्टोबर १९९८ रोजी झाल असून ती २४ वर्षांची आहे. उत्कर्षा आणि ऋतुराज एकमेकांना बऱ्याच वर्षांपासून ओळखत आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-06-2023 at 12:25 IST
Next Story
चेन्नई सुपर किंग्जसाठी खूशखबर! महेंद्रसिंग धोनीची गुडघ्याची शस्त्रक्रिया यशस्वी, सीएसकेचे सीईओ विश्वनाथन म्हणाले…