क्रिकेट विश्वातील महान खेळाडू सचिन तेंडुलकर सोशल मीडियावर सतत कोणता ना कोणता व्हिडीओ शेअर करत असतो. आपल्या व्हिडीओच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना एखादा संदेश मिळावा असा त्याचा प्रयत्न असतो. आतापर्यंत सचिनने आपल्या अकाउंटवरून अनेक व्हिडीओ शेअर केले आहेत. परंतु त्याने नुकताच शेअर केलेला व्हिडीओ नेटकऱ्यांना फारच आवडला आहे.
व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये सचिन तेंडुलकर खॅबी लेमची नक्कल करताना दिसला. या व्हिडीओच्या माध्यमातून त्याने ‘पाणी वाचवा’ हा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. सचिनचा हा व्हिडीओ पाहून त्याचे चाहते खूपच खुश झाले आहेत. या व्हिडीओला आतापर्यंत ४८ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
पोलिसांनाही ‘कच्चा बादाम’ गाण्याची क्रेझ; डान्स करतानाचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल
Viral Video : हा घोडा घेतोय पोहण्याची मजा; व्हिडीओ बघून नेटकरी मात्र झाले हैराण
सचिन ज्याची नक्कल करत आहे तो खॅबी लेम सध्याचा इंटरनेट सुपरस्टार आहे. तो केवळ आपल्या हावभावांवरून लोकांना अनेक गोष्टी समजावतो. सचिननेही खॅबी लेमप्रमाणेच आपला व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे, जो प्रचंड व्हायरल होत आहे.
सचिन तेंडुलकर त्याच्या या व्हिडीओमध्ये तो आपल्या चाहत्यांना एक खास संदेश देत आहे. तो आपल्या व्हिडीओच्या माध्यमातून पाणी वाचवायला सांगत असल्याचं दिसत आहे. या व्हिडीओसोबत त्याने कॅप्शनही लिहिलं आहे. कॅप्शनमध्ये त्याने लिहिलंय, ‘पाण्याचा प्रत्येक थेंब आवश्यक आहे.’ सचिनच्या या व्हिडीओवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. एका युजरने म्हटलंय, ‘ही तर खॅबी लेमची स्टाइल आहे. पण मुद्दा लक्षात आला सर.’ तर एक युजर सचिनला ‘इंडियन खॅबी लेम’ म्हणाला आहे.