Sachin Tendukar Gives Big Advice To Team India : टीम इंडियाचा माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरने टीम इंडियाच्या प्लेईंग ११ बाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. लंडनचं ओव्हल मैदानात फिरकीपटूंसाठी अनुकूल असल्यामुळे बुधवारी ऑस्ट्रेलियाविरोधात होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये भारत अधिक आत्मविश्वासाने मैदानात उतरणार आहे. भारताकडे रविचंद्रन आश्विन आणि रविंद्र जडेजाच्या रुपात जबरदस्त फिरकीपटू आहेत. खेळपट्टीकडे पाहता भारत मजबूत स्थितीत आहे. ओव्हल मैदानात सामना असल्यामुळे भारतीय संघ खूश असेल. ओव्हलच्या मैदानात सामना पुढे जाण्याबरोबरच फिरकीपटूंना येथे मदत मिळते. त्यामुळे या मैदानात फिरकीपटूंची भूमिका महत्वाची ठरणार आहे.

सचिन तेंडुलकरने त्यांची वेबसाईट 100 एमबीस्पोर्ट्सशी बोलताना म्हटलं की, नेहमी टर्निंग विकेटचीच गरज लागते, याची आवश्यकता नाहीय. खेळपट्टीवर चेंडू उसळी घेत असल्यास कधी कधी फिरकीपटूंना याचा फायदाही होऊ शकतो. या सर्व कारणांमुळे ओव्हल मैदान भारतासाठी चांगलं ठिकाण आहे. भारताने इंग्लंडविरोधात २०२१ मध्ये ओव्हलच्या मैदानात १५७ धावांनी विजय मिळवला होता. तेव्हाचा अनुभव भारताच्या कामी येईल, अंस तेंडुलकरचं म्हणणं आहे.

Yuzvendra Chahal wife Dhanashree Verma post on His 200 Wickets
IPL 2024: ‘मी हे आधीपासूनच सांगत होते..’ चहलच्या ऐतिहासिक कामगिरीवर पत्नी धनश्रीची खास पोस्ट
Virat-Gautham interaction video goes viral
KKR vs RCB : भाईचारा ऑन टॉप! विराट-गंभीर एकमेकांशी संवाद साधतानाचा नवीन VIDEO व्हायरल
Michael Vaughan Claims Rohit Sharma to join CSK next year
IPL 2024 : ‘पुढच्या वर्षी रोहित चेन्नईकडून खेळताना दिसणार…’, इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा मोठा दावा
IPL 2024 Gujarat Titans vs Punjab Kings Match Updates in Marathi
IPL 2024: मुंबईकर शशांक ठरतोय पंजाब किंग्जचा तारणहार, जाणून घ्या त्याची आजवरची वाटचाल

नक्की वाचा – WTC 2023 Final: टीम इंडिया दोन फिरकीपटूंना उतरवणार मैदानात? कांगांरुंना गुंडाळण्यासाठी ‘असं’ असेल प्लेईंग ११ चं समीकरण

तेंडुलकर म्हणाला, जेव्हा तुमच्याकडे अशाप्रकारच्या चांगल्या आठवणी असतात, तेव्हा त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होतो. यापूर्वी झालेल्या सामन्यात भारताने विजय मिळवला होता. चांगल्या आठवणी नेहमीच दिर्घकाळासाठी तुमच्यासोबत राहतात. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाला २०१९ मध्ये झालेल्या एशेच कसोटी सामन्यात इंग्लंडने १३५ धावांनी पराभूत केलं होतं. ऑस्ट्रेलियाचा संघ चांगला प्रतिस्पर्धी आहे. पराभव पचवण्यासाठी थोडा वेळ लागतो. पण ऑस्ट्रेलियाचा संघ खूप चांगला आहे. त्यांच्या संघात अनुभव आणि युवा खेळाडूंचं मिश्रण आहे.

टीम इंडियाची संभाव्य प्लेईंग ११

रोहित शर्मा (), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रविंद्र जडेजा, केएस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन/शार्दुल ठाकुर, उमेश यादव/जयदेव उनादकट, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज