पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानात आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरही सहभागी झाला आहे. या अभियानासाठी पंतप्रधानांतर्फे निवडण्यात आलेल्या नऊ सदिच्छा दूतांमध्ये सचिनचा समावेश आहे. ‘‘पंतप्रधानांनी या अभियानासाठी माझी निवड केली. त्यामुळे मी माझ्या पथकासह कामाला लागलो. राज्यसभेचा सदस्य असलेल्या सचिनने पहाटे साडेचार वाजता परिसर स्वच्छ केला. ‘ही केवळ सुरुवात आहे, जास्तीत जास्त लोकांच्या सहभागाने हे अभियान अर्थपूर्ण होईल. आपला देश स्वच्छ ठेवण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून निश्चय केला पाहिजे’, अशा शब्दांत सचिनने आपल्या भावना व्यक्त केल्या.
संग्रहित लेख, दिनांक 6th Oct 2014 रोजी प्रकाशित
स्वच्छता अभियानात सचिनचाही सहभाग
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानात आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरही सहभागी झाला आहे.
First published on: 06-10-2014 at 01:23 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sachin tendulkar joins swachh bharat