Sachin Tendulkar said don’t go to Waqar Younis smile He was a fierce competitor: अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियामवर भारत आणि पाकिस्तान आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ मधील सामन्यात आमनेसामने आले. या सामन्यासाठी बऱ्याच दिग्गज खेळाडूंनीही हजेरी लावली. या सामन्यादरम्यान रवी शास्त्रीसोबत सचिन तेंडुलकर आणि वकार युनूस सामन्याची कॉमेंट्री करताना दिसून आले. यावेळी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने एक जुना किस्सा सांगितला.
सचिन तेंडुलकरने वकार युनूससोबतचा एक अविश्वसनीय क्षण सांगितला. हे दोघेही माजी भारतीय खेळाडू रवी शास्त्रीसोबत सामन्याची कॉमेंट्री करत होते. सचिन तेंडुलकर आणि वकार युनूस यांच्यातील संभाषणावर परत येताना, दोघांनी १९८९ मध्ये एकमेकांविरुद्ध पदार्पण केल्याचा काळ आठवला. याशिवाय रवी शास्त्री यांनी तेंडुलकरला वकार युनूसबद्दल सुरुवातीला काय धारण होती, असे विचारले.
रवी शास्त्री यांनी विचारले की, “१९८९ मध्ये जेव्हा हे दोघे कसोटी क्रिकेटमध्ये एकमेकांविरुद्ध उभे होते, आठवा तेव्हा तुमच्यात काय शब्दांची देवाणघेवाण झाली होती? तुम्ही त्यांच्याकडून काही शिकलात का?” या प्रश्नाला उत्तर देताना सचिन तेंडुलकरने वकार युनूसचे वर्णन नेहमीच कट्टर प्रतिस्पर्धी असल्याचे सांगितले. तसेच लोकांनी युनूसच्या हसण्याकडे लक्ष देऊ नये, जे दिशाभूल करणारे असू शकते, अशी मस्करीही केली. तेंडुलकरने सांगितले की, “त्याच्या हसण्यावर जाऊ नका! तो अत्यंत घातक गोलंदाज होता.”
हेही वाचा – IND vs PAK, World Cup 2023: पाकिस्तानी खेळाडूंनी केले विराट कोहलीचे कौतुक, VIDEO होतोय व्हायरल
सचिन आणि विराट सामन्यापूर्वी साधला संवाद –
भारत पाकिस्तान सामना सुरू होण्यापूर्वी, टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने विश्वचषक ट्रॉफी घेऊन आलेल्या सचिन तेंडुलकरची भेट घेतली. त्यानंतर तेंडुलकर आणि कोहलीने एकमेकांना मिठी मारली आणि काही वेळ गप्पा मारल्या. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
भारताला १९२ धावांचे लक्ष्य –
सामन्याबद्दल बोलायचे तर, एकदिवसीय विश्वचषकाच्या १२व्या सामन्यात भारताचा सामना पाकिस्तानशी होत आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही संघांमधील हा सामना खेळला जात आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानचा संघ ४२.५ षटकांत १९१ धावांवर गारद झाला. भारताला विजयासाठी १९२ धावांचे लक्ष्य मिळाले आहे.