भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला शुक्रवारी ४२व्या वाढदिवशी समाजमाध्यमावर अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी शुभेच्छा दिल्या आहेत. सचिनने नोव्हेंबर २०१३मध्ये क्रिकेटला अलविदा केला होता. पण त्यानंतरही त्याच्यावर करोडो चाहत्यांबरोबर सहकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
चॅम्प सचिनला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
– अनिल कुंबळे
सचिन, वाढदिवसाच्या शुभेच्छा. पाजी तुम्हाला येणारे वर्ष उत्तम जावो.
– रोहित शर्मा</strong>
क्रिकेटमधील महान, आदर्शवत सचिन तेंडुलकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
– विराट कोहली</strong>
सचिन पाजी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
– इशांत शर्मा</strong>
भारतरत्न सचिन तेंडुलकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
– बीसीसीआय