सानिया मिर्झा आणि तिची अमेरिकन साथीदार बेथानी मॅटेक-सँड्स यांचे माद्रिद खुल्या टेनिस स्पर्धेतील आव्हान दुसऱ्या फेरीतच संपुष्टात आले. अॅनास्तासिया पॅव्हल्युचेनकोव्हा आणि ल्युसी साफारोव्हा जोडीने पाचव्या मानांकित सानिया-बेथानी जोडीला ७-५, ६-१ असे नमवले. सानिया-बेथानी जोडीला आठपैकी केवळ दोन ब्रेकपॉइंट्स वाचवण्यात यश मिळाले तर अॅनास्तासिया-ल्युसी जोडीने त्यांची सव्र्हिस सहा वेळा भेदली. दुसऱ्या फेरीत पराभव झाल्याने सानिया-बेथानी जोडीला क्रमवारीत १४० गुणांवरच समाधान मानावे लागले.
फ्रेंच खुली ग्रँडस्लॅम स्पर्धा सुरू होण्यापूर्वी ही जोडी रोम आणि ब्रुसेल्स या दोन स्पर्धामध्ये सहभागी होणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 10th May 2013 रोजी प्रकाशित
माद्रिद टेनिस स्पर्धा : सानिया-बेथानी मॅटेकचे आव्हान संपुष्टात
सानिया मिर्झा आणि तिची अमेरिकन साथीदार बेथानी मॅटेक-सँड्स यांचे माद्रिद खुल्या टेनिस स्पर्धेतील आव्हान दुसऱ्या फेरीतच संपुष्टात आले. अॅनास्तासिया पॅव्हल्युचेनकोव्हा आणि ल्युसी साफारोव्हा जोडीने पाचव्या मानांकित सानिया-बेथानी जोडीला ७-५, ६-१ असे नमवले. सानिया-बेथानी जोडीला आठपैकी केवळ दोन ब्रेकपॉइंट्स वाचवण्यात यश मिळाले तर अॅनास्तासिया-ल्युसी जोडीने त्यांची सव्र्हिस सहा वेळा भेदली.
First published on: 10-05-2013 at 01:00 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sania bethanie exit from madrid open