Sanjay Manjrekar’s reaction to Rohit Sharma : भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसरा एकदिवसीय सामना ७८ धावांनी जिंकत मालिका २-१ ने खिशात घातली. आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. दरम्यान, माजी भारतीय क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी रोहित शर्माबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

संजय मांजरेकर म्हणाले, गेल्या काही वर्षांत डाव्या हाताच्या वेगवान गोलंदाजांविरुद्ध झगडताना दिसणारा रोहित शर्मा आता तांत्रिकदृष्ट्या अधिक मजबूत झाला आहे. मांजरेकरांनी सांगितले, की मिचेल स्टार्क आणि शाहीन शाह आफ्रिदीने यापूर्वी रोहितला त्यांच्या वेगाने त्रास दिला होता, परंतु रोहितने एकदिवसीय विश्वचषकात त्यांचा सामना केला. त्यामुळे आता डावखुऱ्या फलंदाजांविरुद्ध रोहितचा कमकुवतपणा ही भूतकाळातील गोष्ट झाली आहे.

स्टार स्पोर्ट्सवर बोलताना मांजरेकर म्हणाले, ‘तुम्ही ज्या कमकुवतपणाबद्दल बोलत आहात, ती डाव्या हाताच्या गोलंदाजाविरुद्ध भूतकाळातील गोष्ट आहे. गेल्या दोन-तीन वर्षांत त्याला कोणतीही अडचण आली नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या नव्या चेंडूवर तो आरामात खेळताना दिसला. विश्वचषकात शाहीन आफ्रिदी धोकादायक मानला जात होता, त्याच्याविरुद्ध रोहित फ्रंट फूटवर फलंदाजी करताना दिसला होता. त्यामुळे मला वाटते की तो एक चांगला कसोटीपटू झाला आहे.’

हेही वाचा – IND vs SA : स्टार फलंदाजाने घेतला मोठा निर्णय! कसोटी मालिकेनंतर होणार निवृत्त

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मांजरेकर पुढे म्हणाले, ‘माझ्याकडे इंग्लंडमधील त्याची अतुलनीय आठवण आहे. जेव्हा तो कसोटी सलामीवीर म्हणून मैदानात उतरला आणि तिथे शतक झळकावले होते. मालिकेत तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. या मालिकेत रोहितने जितका वेळ खेळपट्टीवर तग धरला होता. त्यामुळे रोहितला कसोटीत मोठ्या उंचीवर घेऊन जाते. विश्वचषकात त्याने खेळलेल्या भूमिकेच्या ही पूर्णपणे विरुद्ध आहे.’ भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला कसोटी सामना २६ डिसेंबरपासून सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट्स पार्कमध्ये खेळवला जाणार आहे.

भारताचा कसोटी संघ –

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड, केएस भरत (यष्टीरक्षक), केएल राहुल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाशदीप, . जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), प्रसिध कृष्णा.