Sara Tendulkar Breakup Reports: भारताचा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकर अनेकदा चर्चेत असते. सारा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. त्यामुळे तिचे फोटो, व्हीडिओही चर्चेत असतात. पण सारा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेचा विषय असते. गेल्या काही दिवसांपूर्वी साराचं नाव बॉलीवूड अभिनेत्याबरोबर जोडलं जात होतं. पण आता याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे.

दोन आठवड्यांपूर्वीच, बॉलिवूड अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी आणि सारा तेंडुलकर यांच्या डेटिंगच्या बातम्या माध्यमांमध्ये चर्चेत आल्या होत्या. पण आता दोघांनीही त्यांचे नाते संपुष्टात आणले आहे, अशी माहिती समोर आली आहे.

ईटाइम्सच्या वृत्तानुसार, सिद्धांत चतुर्वेदी आणि सारा तेंडुलकर वेगळे झाल्याचे वृत्त आहे. अहवालानुसार, अनेक वेळा एकत्र दिसल्यानंतर डेटिंगच्या अफवांदरम्यान या दोघांनी एकमेकांना त्यांच्या कुटुंबियांशी ओळख करून दिल्याचे वृत्त आहे. त्यामुळे हे नाते गंभीर असल्याचं दिसत होतं. पण आता हे जोडपं वेगळं झालं आहे आणि असं म्हटलं जात आहे की सिद्धांतने स्वतः हे नाते संपवण्याचा निर्णय घेतला आहे. सिद्धांत आणि साराने कधीही त्यांच्या नात्याची अधिकृतपणे पुष्टी केलेली नाही. ही बातमी रिपोर्टमध्ये समोर आली आहे.

अहवालात एका सूत्राने खुलासा केला की, “त्यांचं अलिकडेच ब्रेकअप झाले आहे. सिद्धांतनेच ते नाते संपवण्याचा निर्णय घेतला. दोघे एकमेकांच्या कुटुंबियांना भेटल्यानंतर हे सर्व घडलं. त्या दोघांच्या वेगळं होण्यामागचं कारण आम्हालाही कळलं नाही.” दोघेही त्याचं नातं अगदी गंभीरपणे पुढे नेते होते, पण कुटुंबाच्या भेटीनंतर गोष्टी संपल्यासारखे दिसले.

सारा आणि सिद्धांत यांच्या वेगळे होण्यामागील कारण रिपोर्टमध्ये सांगितलेलं नाही. यापूर्वी, सिद्धांतचे नाव अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदासोबतही जोडले गेले होते, परंतु ते नातेही फार काळ टिकले नाही, तर सारा शुबमन गिलला डेट करत असल्याच्या अफवा पसरल्या होत्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

साराने लंडनमधून बायोमेडिकल सायन्स आणि क्लिनिकल न्यूट्रिशनमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आहे आणि ती सचिन तेंडुलकर फाउंडेशनशी सक्रियपणे जोडलेली आहे. अलिकडेच सारा तेंडुलकरने बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चांना फेटाळून लावलं होतं. एका मुलाखतीत तिने सांगितले होते की तिच्या स्वभावामुळे तिला अभिनयापासून दूर राहणं आवडतं.