Sarfaraz Khan becomes father : बंगळुरू कसोटी सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध १५० धावांची दमदार खेळी करणाऱ्या सर्फराझ खानला आनंदाची बातमी मिळाली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिले शतक झळकावले, तर दोन दिवसांनंतर सोमवारी त्याच्या घरी नवीन पाहुण्याचे आगमन झाले आहे. तो आता ‘बापमाणूस’ झाला आहे. त्यांची पत्नी रोमना जहूरने मुलाला जन्म दिला आहे.

याबाबत स्वतः सर्फराझ खानने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर फोटो शेअर करुन माहिती दिली आहे. सर्फराझ खान आणि रोमना जहूर यांचे गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये लग्न झाले होते. सर्फराझने इन्स्टा स्टोरीवर दोन फोटो शेअर केले आहेत. एका फोटोत तो आपल्या बाळासोबत दिसत असून तो मुलगा असल्याचे लिहिले आहे, तर दुसऱ्या फोटोत तो वडील आणि बाळासोबत दिसत आहे. सर्फराझ खान आणि त्याच्या कुटुंबासाठी गेले काही दिवस चढ-उताराचे होते.

सर्फराज खानने आपल्या मुलासोबतचा फोटो शेअर केला.

सर्फराझचा धाकटा भाऊ मुशीर खान आणि वडील नौशाद खान यांचा कार अपघात झाला होता, ज्यात मुशीर खान जखमी झाला, मात्र वडील नौशाद सुरक्षित राहिले. यामुळे मुशीर मुंबईसाठी इराणी कपमध्ये खेळू नाही. माात्र, सर्फराझ खानने या सामन्यात खेळताना द्विशतक झळकावले. असे असूनही त्याला भारतीय संघात स्थान मिळत नव्हते, पण जेव्हा शुबमन गिलला मानदुखीचा त्रास झाला, तेव्हा त्याला पुन्हा कसोटी संघात संधी मिळाली.

सर्फराझ खानची इन्स्टा स्टोरी

हेही वाचा – Rishabh Pant : दिल्ली कॅपिटल्स ऋषभ पंतला सोडणार? इन्स्टावर शेअर केलेल्या स्टोरीने वेधलं सर्वांचं लक्ष

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या वर्षाच्या सुरुवातीला कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या सर्फराझ खानला बंगळुरू कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात आपले खाते उघडता आले नाही, परंतु दुसऱ्या डावात १५० धावा करून टीम इंडियाचे पुनरागमन केले. मात्र, त्यानंतरच्या फलंदाजांना फारशा धावा करता आल्या नाहीत. त्यामुळे भारतानेन्यूझीलंडला १०७ धावांचे लक्ष्य दिले, जे त्यांनी दोन गडी गमावून सहज पूर्ण करत ऐतिहासिक विजय मिळवला.