पुरुषांच्या आगामी हॉकी विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघासमोर खडतर आव्हान असले तरी भारताने उपांत्य फेरीत मजल मारणे पुरेसे ठरेल, असे मत भारतीय संघाचे माजी कर्णधार परगट सिंग यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, ‘‘गेल्या वर्षांपासूनची भारतीय संघाची कामगिरी पाहता, आपण उपांत्य फेरी गाठणे म्हणजे समाधानकारक कामगिरी म्हणावी लागेल. भारतीय संघ सध्या जागतिक क्रमवारीतही आठव्या स्थानी आहे. त्यातच रमणदीप सिंग आणि निकिम थिमय्या या अव्वल खेळाडूंना दुखापतीला सामोरे जावे लागले. अव्वल संघांबरोबर भारताने चांगली कामगिरी करायला हवी.’’