तामिळनाडू व रेल्वे यांनी वरिष्ठ गटाच्या ६२ व्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत अनुक्रमे पुरुष व महिला गटात विजेतेपद पटकाविले.
अंतिम लढतीत तामिळनाडूने उत्तराखंड संघावर २५-१७, २५-१६, २५-१४ असा सरळ सेट्समध्ये विजय मिळविला. त्या वेळी विजयी संघाकडून नवीन राजा जेकब व जी.आर.वैष्णव यांनी स्मॅशिंगचा सुरेख खेळ केला.
गतविजेत्या केरळ संघास तिसरे स्थान मिळाले. त्यांनी सेनादलाचा २३-२५, २१-२५, २५-१९, २५-१७, २५-१० असा पराभव केला.
महिलांच्या अंतिम सामन्यात गतविजेत्या रेल्वेने केरळचा २५-१७, २५-१०, २३-२५, २५-२१ असा पराभव केला.
विजयी संघाकडून मिनिमोल अब्राहम व व्ही.सौम्या यांचा खेळ कौतुकास्पद होता. तामिळनाडूने हरयाणाास २६-२४, २५-१६, २५-२१ असे पराभूत करीत तिसरे स्थान मिळविले.
संग्रहित लेख, दिनांक 30th Dec 2013 रोजी प्रकाशित
वरिष्ठ राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धा : तामिळनाडू आणि रेल्वेला विजेतेपद
तामिळनाडू व रेल्वे यांनी वरिष्ठ गटाच्या ६२ व्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत अनुक्रमे पुरुष व महिला गटात विजेतेपद पटकाविले.
First published on: 30-12-2013 at 01:52 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Senior national volleyball championship tamil nadu and railways bagged mens and womens titles