Shahid Afridi on Shaheen Afridi’s T20 Captaincy: २०२३च्या विश्वचषकातील निराशाजनक कामगिरीनंतर पाकिस्तान क्रिकेट संघात आमूलाग्र बदल झाले. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) संपूर्ण निवड समितीमध्ये सुधारणा केली होती. बाबर आझमने तिन्ही फॉरमॅटमध्ये संघाचे कर्णधारपद सोडले. शान मसूदला कसोटीत ही जबाबदारी मिळाली आहे. बाबर आझमच्या जागी वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीला टी-२० कर्णधार बनवण्यात आले आहे. पण शाहीनचे सासरे शाहिद आफ्रिदी यांना त्याने कर्णधार व्हावे असे वाटत नव्हते.

विश्वचषक २०२३मध्ये पाकिस्तानच्या खराब कामगिरीनंतर संघात अनेक बदल करण्यात आले. बाबर आझमला कर्णधारपद गमवावे लागले. शान मसूदला कसोटी मध्ये कर्णधार बनवण्यात आलं होतं आणि टी-२०चं कर्णधारपद शाहीन आफ्रिदीकडे सोपवण्यात आलं होतं. त्याचवेळी, आता शाहीनचे सासरे शाहिद आफ्रिदी याने शाहीनच्या टी-२० कर्णधारपदाबाबत एक मजेशीर विधान दिले आहे जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडीओमध्ये शाहिदला मोहम्मद रिझवानला टी-२०चा कर्णधार म्हणून पाहायचे होते, जावई शाहीनला नाही. व्हिडीओमध्ये शाहिद म्हणतो आहे की, “मला मोहम्मद रिझवानला टी-२० संघाचा कर्णधार बनवायचा होता, शाहीन चुकून टी-२० संघाचा कर्णधार झाला.” हे बोलल्यावर शाहिद हसायला लागतो. शाहिद आफ्रिदीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

विराट कोहलीच्या जिव्हारी लागली ‘ती’ विकेट! चाहत्याने प्रश्न विचारतच एका सेकंदात दिली प्रतिक्रिया, पाहा Video
Axar Patel on Impact Player Rule in IPL 2024
IPL 2024 : अक्षर पटेलने ‘इम्पॅक्ट प्लेयर’च्या नियमावर उपस्थित केला प्रश्न, सांगितले ‘या’ खेळाडूंसाठी का आहे धोकायदायक?
Akash Chopra Says Hardik Pandya’s yet but his absence is definitely hurting GT this season
IPL 2024 : “त्याच्या उपस्थितीचा मुंबईला फायदा झाला नसेल, पण…”, हार्दिक पंड्याबाबत माजी क्रिकेटपटूचं मोठं वक्तव्य
Brad Hogg Says Parag Is eggo
IPL 2024 : ‘त्याच्यामध्ये अजूनही अहंकार आहे…’, ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूचे रियान परागबद्दल मोठं वक्तव्य

हेही वाचा: IND W vs AUS W: ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात सलग नऊ पराभवाची मालिका हरमनब्रिगेड तोडणार का? जाणून घ्या

शाहीन चुकून कर्णधार झाला

शाहिद आफ्रिदीने शाहीन टी-२०चा कर्णधार बनण्यावर जरी मजेशीर कमेंट केली असली तरी, त्याने पाकिस्तान क्रिकेट मधील अनागोंदी कारभाराकडे लक्ष वेधले आहे. मोहम्मद रिझवानला कर्णधारपद मिळावे अशी त्याची इच्छा होती. रिझवान, शाहीन, वेगवान गोलंदाज हारिस रौफ आणि यष्टिरक्षक-फलंदाज सरफराज अहमद यांचा समावेश असलेल्या अलीकडील कार्यक्रमादरम्यान आफ्रिदीने रिझवानचे कौतुक केले. त्याने विश्वचषकातील अनुभवी स्टारच्या कामगिरीचे कौतुक केले आणि सांगितले की, “मला रिझवान हा टी-२० कर्णधार हवा होता कारण, तो बाबर नंतर संघात अनुभवी आहे. शाहीन अजूनही युवा आहे. नेतृत्व करण्याची क्षमता त्याच्यात आलेली नाही. कर्णधारपदाच्या दबावामुळे त्याच्या गोलंदाजीवर परिणाम होऊ शकतो. ही पद रिझवानला मिळायला हवे होते जे चुकून शाहीनला मिळाले आहे. शाहीन हे पद उत्तम पद्धतीने निभावेल असे मला वाटते. आगामी टी-२० विश्वचषक पाकिस्तान संघासाठी खूप महत्वाचा आहे. त्या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे.”

शाहिद आफ्रिदी फाउंडेशनने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात तो पुढे म्हणाला, “मी रिझवानच्या मेहनतीचे आणि प्रामाणिक पणाचे कौतुक करतो. त्याच्या फलंदाजीतील कौशल्य मला सर्वात जास्त भावतात, फक्त त्याच्या खेळीत सातत्य असणे आवश्यक आहे. यासाठी त्याने त्याच्या फलंदाजीवर अधिक लक्ष केंद्रित करणे आणि इतर कोण काय करत आहे आणि काय नाही याकडे दुर्लक्ष करणे महत्वाचे आहे.”

शाहीनसमोर मोठे आव्हान

शाहीन आफ्रिदीची कर्णधार म्हणून पहिली नियुक्ती न्यूझीलंडविरुद्ध १२ जानेवारीपासून सुरू होणारी पाच सामन्यांची टी-२० मालिका महत्वाची असेल. ही सामने १२, १४, १७, १९ आणि २१ जानेवारी रोजी खेळवले जातील. शाहीन आफ्रिदीला हे मोठे आव्हान पेलावे लागणार आहे कारण, यावर्षी जूनमध्ये टी-२० विश्वचषक आहे. २००९ पासून पाकिस्तानला विजेतेपद मिळालेले नाही.