157 kmph: ‘या’ गोलंदाजाने फेकला IPL इतिहासातील सर्वात वेगवाग चेंडू; उमरान मलिक कितव्या स्थानावर?

उमरानने दिल्ली कॅपिटल्सची फलंदाजी सुरु असताना २० व्या षटकातील चौथा चेंडू 157 kmph च्या वेगानं फेकला होता.

Fastest Deliveries In IPl History
IPL इतिहासातील सर्वात वेगवान चेंडू. (Image-Indian Express)

Fastest Ball In IPL History : आयपीएल २०२२ मध्ये झालेल्या ५० व्या सामन्यात सनरायजर्स हैद्राबादचा गोलंदाज उमरान मलिकनने एक वेगवान चेंडू फेकत इतिहास रचला होता. उमरानने दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध झालेल्या या सामन्यात आयपीएलच्या इतिहासातील दुसरा वेगवान चेंडू फेकला होता. उमरानच्या गोलंदाजीचा वेग पाहून क्रिडा विश्वात सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

उमरान मलिकने रचला होता इतिहास

उमरानने दिल्ली कॅपिटल्सची फलंदाजी सुरु असताना २० व्या षटकातील चौथा चेंडू 157 kmph च्या वेगानं फेकला होता. हा चेंडू आयपीएल इतिहासातील दुसरा वेगवान चेंडू म्हणून नोंदवण्यात आला. आयपीएल इतिहासात सर्वात वेगवान चेंडू फेकण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या माजी गोलंदाज शॉन टेटच्या नावावर आहे. शॉनने आयपीएल २०११ मध्ये 157.71 kmph वेगाने चेंडू फेकला होता.

नक्की वाचा – IPL इतिहासातील ‘नर्व्हस ९९’; शतकाच्या उंबरठ्यावर असताना ‘या’ फलंदाजांना दाखवला पॅव्हेलियनचा रस्ता

आयपीएल इतिहासात सर्वात वेगवान चेंडू फेकण्याचा विक्रम

१) शॉन टेट (ऑस्ट्रेलिया) – 157.71 kmph
२) उमरान मलिक (भारत) – 157.00 kmph
3) एनरिक नॉर्किया (दक्षिण आफ्रिका) – 156.22 kmph
४) उमरान मलिक (भारत) – 156.22 kmph
५) एनरिक नॉर्किया (दक्षिण आफ्रिका) – 155.21 kmph
६) उमरान मलिक (भारत) – 154.80 kmph

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-03-2023 at 22:10 IST
Next Story
IPL 2023 : चेन्नई सुपरकिंग्जला मोठा धक्का, आघाडीचा गोलंदाज ‘या’ कारणामुळे आयपीएलबाहेर
Exit mobile version