Shikhar Dhawan Emotional Post For Son: टीम इंडियाचा फलंदाज शिखर धवन हा त्याच्या मैदानातील तुफानी खेळीने अनेकांना फार कठोर वाटत असला तरी सोशल मीडियावर अनेकदा त्याची तितकी मस्तमौला आणि हळवी बाजू सुद्धा पाहायला मिळाली आहे. विशेषतः शिखर धवनच्या घटस्फोटानंतर एक वडील म्हणून त्याचा जो संघर्ष सुरु आहे तो अनेकांना भावुक करून जाणारा आहे. आज सुद्धा शिखर धवनने आपल्या लेकाच्या वाढदिवसाच्या निमित्त एक खास पोस्ट केली आहे. यामध्ये त्याने मुलाला प्रत्यक्ष भेटून एक वर्ष झालं आणि आता तीन महिन्यांपासून तर आपला कुठलाच संपर्क होऊ शकलेला नाही असे सुद्धा नमूद केले आहे. शिखरच्या या भावनिक पोस्टवर अनेकांनी दुःख व्यक्त करत सांत्वन करण्याचा प्रयत्न केला आहे.

शिखर धवनला मुलापासून विभक्त का राहावे लागत आहे?

दिल्ली न्यायालयाने शिखरला मोठा दिलासा दिला असून मानसिक छळाच्या पार्श्वभूमीवर पत्नी आएशा मुखर्जीपासून त्याचा घटस्फोट मंजूर केला आहे. २०१२ साली शिखर धवन आणि आएशा मुखर्जी विवाहबद्ध झाले होते,त्यांना झोरावर धवन नावाचा १० वर्षांचा मुलगा आहे. आएशा आणि झोरावर हे दोघेही ऑस्ट्रेलियन नागरिक असून ऑस्ट्रेलियातच वास्तव्यास आहेत.

vasai leopart marathi news, vasai fort leopard marathi news
वसई : बिबट्याच्या दहशतीचा परिणाम, रोरोच्या संध्याकाळच्या शेवटच्या दोन फेऱ्या रद्द
surya grahan 2024 negative impact of solar eclipse on these three zodiac sign read more
५४ वर्षांनंतर सूर्यग्रहणात तयार होणार दुर्मीळ योग, ‘या’ तीन राशींच्या अडचणी वाढणार?
clemen lobo arrested after 36 years in salim cassetwala murder case
वसईतील प्रसिध्द सलीम कॅसेटवाला हत्या प्रकरण; फरार आरोपी क्लेमेन लोबोला ३६ वर्षांनी अटक
Gold Silver Price
Gold-Silver Price on 1 April 2024: आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी सोन्या-चांदीच्या भावात तेजी, वाचा आजचे दर

आएशा यांनी धवनला त्यांचा मुलगा झोरावर पासून लांब राहण्यास भाग पाडल्यामुळे त्यांना मानसिक त्रास झाला असे न्यायालयाने मान्य केले असले तरी मुलाचा संपूर्ण ताबा धवनला देण्यात आलेला नाही. त्याऐवजी, धवनला मुलगा झोरावरला ठराविक कालावधीसाठी भेटण्याची मुभा देण्यात आली आहे. व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून धवनला लेकाशी संवाद साधण्याची परवानगी देण्यात आली आहे.

शिखर धवनने पोस्टमध्ये काय म्हटलंय?

मी तुला प्रत्यक्ष भेटून एक वर्ष झाले आहे, आणि आता, जवळजवळ तीन महिन्यांपासून, मला सर्वत्र ब्लॉक केले गेले आहे, त्यामुळे तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आपला जुनाच फोटो पोस्ट करत आहे. मी तुझ्याशी थेट संपर्क साधू शकत नसलो तरीही, मी मनाने तुझ्याशी जोडला गेलो आहे. मला तुझा खूप अभिमान आहे आणि मला माहित आहे की तू खूप छान गोष्टी करत आहेस आणि छान मोठा होत आहेस.

तुझा बाबा नेहमी तुझी आठवण काढतो आणि तुझ्यावर प्रेम करतो. तो नेहमी सकारात्मक असतो, देवाच्या कृपेने जेव्हा आपण पुन्हा भेटू तेव्हा हसतमुखाने वाट पाहत असतो. तू नेहमी खोडकर राहा व पण कुणालाच त्रास देऊ नकोस, नम्र, दयाळू, सहनशील आणि बलवान हो.

तुझ्यापर्यंत पोहोचत नसले तरी मी तुला रोज मेसेज करत असतो. तुझ्या भल्याचा आणि प्रगतीचा विचार करत असतो. माझ्या आयुष्यात काय सुरु आहे हे सांगत असतो.

लव्ह यू लोड झोरा ❤️
पापा

हे ही वाचा<< हार्दिक पंड्याला १५ कोटी दिलेच वर मुंबई इंडियन्सने गुजरात संघाला किती रक्कम दिली ऐकून व्हाल थक्क!

दरम्यान, यापूर्वी घटस्फोटानंतर सुद्धा शिखर धवनने हाच फोटो शेअर करत एक भावनिक शायरी लिहिली होती. आजच्या पोस्टवर सुद्धा अनेकांनी शिखरला आधार देत आम्ही तुझे दुःख समजू शकतो आणि लवकरच तुमची भेट व्हावी अशी प्रार्थना करतो असे म्हटले आहे.