scorecardresearch

IND vs PAK : ‘मला बदला घ्यायचा आहे…’ २०११च्या आठवणींना उजाळा देताना शोएब अख्तरने केले मोठं वक्तव्य

Shoaib Akhtar on IND vs PAK Match : वनडे वर्ल्ड कप ऑक्टोबरमध्ये सुरू होईल पण पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने मार्चमध्येच मोठी भविष्यवाणी केली आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना कोणत्या दोन संघांमध्ये खेळवला जाईल हे त्यांनी सांगितले आहे.

Shoaib Akhtar on IND vs PAK Match
शोएब अख्तर (फोटो-संग्रहित छायाचित्र इंडियन एक्सप्रेस)

Shoaib Akhtar Statement: आयसीसी वनडे विश्वचषक पुन्हा एकदा भारतीय भूमीवर होणार आहे. १२ वर्षांपूर्वी जेव्हा भारतात विश्वचषक झाला, तेव्हा टीम इंडियाने एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली विजेतेपद मिळवून इतिहास रचला होता. याच विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत टीम इंडियाने मोहालीच्या मैदानावर पाकिस्तानला पराभूत करून अंतिम फेरी गाठली होती. तो राग आजही पाकिस्तानी खेळाडू आणि माजी दिग्गजांच्या मनात आहे. त्यावर पाकिस्तानच्या माजी खेळाडू शोएब अख्तरने एक मोठे वक्तव्य केले आहे.

यावेळी एकदिवसीय विश्वचषकाच्या फायनलमध्ये भारत आणि पाकिस्तानची लढत पाहायला मिळू शकते, असा विश्वास शोएब अख्तरने व्यक्त केला आहे. त्याच्या मते, दोन्ही संघ विजेतेपदाच्या सामन्यात आमनेसामने यावेत आणि पाकिस्तानने २०११ विश्वचषक उपांत्य फेरीचा बदला घ्यावा. तसेच विजेतेपदावर कब्जा करावा अशी त्याची इच्छा आहे.

‘स्पोर्ट्स तक’शी बोलताना शोएब अख्तर म्हणाला, “भारत आणि पाकिस्तान आशिया चषक तसेच विश्वचषकात फायनल खेळतील. भारत पाकिस्तानात (आशिया कपसाठी) येईल आणि पाकिस्तानही वर्ल्डकपसाठी भारतात जाईल. मला पूर्ण आशा आहे की या दरम्यान गोष्टी चांगल्या होतील. भारत आणि पाकिस्तान, आणि व्यापार खुला होईल. मी दोन्ही संघातील लोकांना सकारात्मकता पसरवण्याचे आणि दरी कमी करण्याचे आवाहन करतो.”

हेही वाचा – Team India: ‘…म्हणून भारतीय संघ १० वर्षे झाली तरी आयसीसी ट्रॉफी जिंकू शकला नाही’, पाकिस्तानच्या माजी खेळाडूचे वक्तव्य

रावळपिंडी एक्सप्रेसने मोहालीतील २०११ विश्वचषकातील उपांत्य फेरीची आठवण करून दिली. त्याने सांगितले की २०२३ मध्ये पाकिस्तानने भारताकडून ‘बदला’ घ्यावा अशी त्यांची इच्छा आहे. त्या उपांत्य फेरीत शोएब अख्तर पाकिस्तान इलेव्हनचा भाग नव्हता. तो सामना जिंकून भारताने अंतिम फेरीत स्थान निश्चित केले होते.

अख्तर म्हणाला, “मला २०११ च्या विश्वचषकाचा बदला घ्यायचा आहे, मी त्या सामन्यात खेळलो नाही. मला वानखेडे, अहमदाबाद किंवा कुठेही भारत विरुद्ध पाकिस्तान फायनल बघायची आहे. फायनल पाहण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन. शोएब अख्तर म्हणतो की बीसीसीआय आणि पीसीबीमध्ये काहीही साम्य नाही. दोघेही आपल्या सरकारला विचारल्याशिवाय काहीही करू शकत नाहीत.”

हेही वाचा – ICC ODI Rankings: विराट-रोहितला मागे टाकत ‘या’ युवा फलंदाजाने वनडे क्रमवारीत मारली बाजी; टॉप-५ मध्ये मिळवले स्थान

विशेष म्हणजे पाकिस्तानला आजपर्यंत भारताविरुद्धचा एकदिवसीय विश्वचषक सामन्यात जिंकता आलेले नाही. दुसरीकडे, कोणत्याही आयसीसी विश्वचषकाच्या फायनलबद्दल बोलायचे झाले तर आजपर्यंत या स्पर्धेच्या अंतिम फेरीत हे दोन संघ कधीच भिडले नाहीत. याआधी २००७ टी-२० वर्ल्ड कप फायनल आणि २०१७ चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये हे दोन्ही संघ भिडले होते.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-03-2023 at 17:33 IST

संबंधित बातम्या