Shreyas Iyer and Shubman Gill's confusion in runout video viral: कोणत्याही संघासाठी संवाद खूप महत्त्वाचा असतो. जेव्हा प्रत्येकी एक धाव घेण्यासाठी संघर्ष होतो तेव्हा दोन खेळाडूंमध्ये हे सर्वात महत्त्वाचे ठरते. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात शुक्रवारी झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात श्रेयस अय्यर आणि शुबमन गिल यांच्यात अशी चूक झाली. ज्यामुळे टीम इंडियाला एक विकेट गमवावी लागली. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हे दृश्य २४ व्या षटकात पाहायला मिळाले. भारताला दमदार सुरुवात करुन देणारा ऋतुराज गायकवाड ७१ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला होता. अशा परिस्थितीत शुबमन गिलसोबत भक्कम भागीदारी उभारण्याची जबाबदारी श्रेयसच्या खांद्यावर आली होती. त्याने २४ व्या षटकातील चौथ्या चेंडूवर एक्स्ट्रा कव्हरकडे धाव घेण्याचा प्रयत्न केला. तो शॉट खेळताच धाव घेण्यासाठी सरसावला. दुसऱ्या टोकाला उभ्या असलेल्या शुबमन गिलनेही त्याला हाक मारली आणि क्रीज सोडली. यानंतर श्रेयस अर्ध्यावर पोहोचल्यावर गिलने त्याला परत जाण्याचा इशारा केला. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता आणि श्रेयस क्रीझमध्ये पोहोचण्याआधीच कॅमेरून ग्रीनच्या एका शानदार थ्रोने विकेट्स विखुरल्या होत्या. या विकेटनंतर श्रेयस खूपच निराश दिसत होता. यानंतर या धावपळीत चूक कोणाची हा चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला. हेही वाचा - IND vs AUS: आशिया कप फायनलसाठी पहिल्यांदा आश्विनला बोलावण्यात आले होते, परंतु ‘या’ कारणामुळे त्याने दिला नकार नक्की चूक कोणाची? कॉमेंट्री रूममध्ये अमित मिश्रा आणि सुरेश रैना यांना हा प्रश्न विचारला असता, दोघांनीही श्रेयसने एवढी जोखीम असणारी धाव घ्यायला नको होती, असे सांगितले. मिश्रा म्हणाला, श्रेयस लगेच धाव घेण्यासाठी धावला. त्याने गिलला हो किंवा नाही अशी कोणतीही संधी दिली नाही. मात्र, रैनालाही श्रेयसच्या या जोखमीच्या धावेची गरज भासली नाही. मात्र, नॉन स्ट्रायकर म्हणून उभ्या असलेल्या गिलनेही योग्य संवाद साधायला हवा होता, असेही ते म्हणाले.