T20 Mumbai League Final: टी-२० मुंबई लीग स्पर्धा शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. एका आठवड्यात एकापेक्षा एक रोमांचक सामने पाहायला मिळाले. शेवटी श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या सोबो मुंबई फाल्कन्स आणि दुसरीकडे सिद्धेश लाडच्या नेतृत्वाखालील फॉर्ममध्ये असलेला मुंबई साउथ सेंट्रल मराठा रॉयल्स संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. हा सामना गुरूवारी वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे.

सिद्धेश लाडने या हंगामात दमदार कामगिरी केली आहे आणि त्याच्या नेतृत्वाखाली संघानेही दमदार कामगिरी केली आहे. ईगल स्ट्रायकर्स ठाणे विरुद्धच्या उपांत्य फेरीत झालेल्या सामन्यात मुंबई साउथ सेंट्रल मराठा रॉयल्स संघाने दमदार विजयाची नोंद करत स्पर्धेतील अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. आता सिद्धेश लाडला असा विश्वास आहे की रॉयल्सचा संघ जेतेपदावर नाव कोरू शकतो.

“आम्ही अंतिम सामन्याबद्दल जास्त विचार करत नाही आहोत. हो, दबाव असेल कारण हा अंतिम सामना आहे, परंतु आम्हाला शांत राहायचे आहे आणि सर्वोत्तम कामगिरी करायची आहे,” असेही सिद्धेश लाड म्हणाला.

तसेच तो पुढे म्हणाला, “इरफान ( उमैर), रोहन ( राजे) , घाग ( रोहन), साहिल ( जाधव) या सर्वांनीच यात योगदान दिले आहे. आम्ही निर्माण केलेले वातावरण तरुणांना मोठ्या व्यासपीठावर येऊन आपलं टॅलेंट दाखवण्यासाठी फायदेशीर ठरत आहे.”

श्रेयस अय्यर हा भारतीय संघातील अनुभवी खेळाडूंपैकी एक आहे. आयपीएल २०२५ स्पर्धेत त्याने दमदार कामगिरी केली आहे. त्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पंजाब किंग्ज संघाने आयपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. मात्र, अंतिम फेरीत पंजाबला पराभवाचा सामना करावा लागला. ही स्पर्धा झाल्यानंतर आता त्याने टी-२० मुंबई लीग स्पर्धेत सोबो मुंबई फाल्कन्स संघाला फायनलमध्ये पोहोचवलं आहे. या संघालाही जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे. दोन्ही संघांनी दमदार खेळ करून स्पर्धेतील अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळे अंतिम सामन्यात रोमांचक लढत पाहायला मिळू शकते.

या हंगामात युवा खेळाडूंनी दमदार खेळ केला आहे. ईगल ठाणे स्ट्रायकर्सचा साईराज पाटील धावांच्या यादीत आघाडीवर आहे. त्याने या हंगामात २३३ धावा केल्या आहेत. यादरम्यान ६१ धावा ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. तो ऑरेंज कॅपच्या शर्यतीत अव्वल स्थानी आहे. ईगल ठाणे स्ट्रायकर्सचा शशांक आत्तार्डेकडे (११ बळी) पर्पल कॅपच्या यादीत आहे. इतर सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्यांमध्ये सूर्यकुमार यादव, ट्रायम्फ नाईट्स मुंबई नॉर्थ ईस्टचा सिद्धांत अधत्राव, बांद्रा ब्लास्टर्सचा सुवेद पारकर तसेच मुंबई साउथ सेंट्रल मराठा रॉयल्सचा सिद्धेश लाड आणि चिन्मय सुतार यांचा समावेश आहे. या सर्वांनी लीग टप्प्यात महत्त्वपूर्ण अर्धशतके झळकावली.

अंतिम सामना कुठे पाहता येईल?
स्टार स्पोर्ट्स २ ( इंग्लिश) आणि जिओ हॉटस्टार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सामना किती वाजता सुरू होईल?
गुरुवार, १२ जून, रात्री ७.३० वाजता