शुबमन गिल इंग्लंड दौऱ्यावर वादळी फॉर्मात आहे. गिलने इंग्लंडविरूद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात द्विशतकानंतर आता दुसऱ्या डावात शतक झळकावलं आहे. शुबमन गिलने पहिल्या डावात २६९ धावांची विक्रमी खेळी करत अनेक मोठमोठे विक्रम आपल्या नावे केले आहेत. तर त्याने दुसऱ्या डावातील शतकासह अजून काही विक्रमांना गवसणी घातली आहे.
शुबमन गिलने १३० चेंडूत ९ चौकार आणि ३ षटकारांसह आपलं शतक पूर्ण केलं. शुबमन गिल हा कसोटी क्रिकेटमध्ये लिटिल मास्टर सुनील गावस्कर यांच्यानंतर अनोखी कामगिरी करणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. शुबमन गिलने एजबेस्टन कसोटीच्या पहिल्या डावात द्विशतक करत २६९ धावांची विक्रमी खेळी केली. तर आता गिलने दुसऱ्या डावात शतकही केलं आहे.
शुबमन गिल हा एका कसोटी सामन्यात द्विशतक आणि शतक करणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. सुनील गावस्करांनी १९७१ मध्ये वेस्ट इंडिजविरूद्ध पोर्ट ऑफ स्पेन येथे झालेल्या कसोटी सामन्यातील दोन्ही डावांमध्ये द्विशतक आणि शतक झळकावलं होतं. आता ही कामगिरी शुबमन गिलने आपल्या नावे केली आहे. तर इंग्लंडच्या धर्तीवर दुसऱ्यांदा एखाद्या फलंदाजांने शतक आणि द्विशतक एकाच सामन्यात केलं आहे. तर शुबमन गिल हा जगातील दुसरा कसोटी कर्णधार ठरला आहे. त्याच्याआधी कर्णधार ग्रॅहम गुच यांनी इंग्लंडमध्ये भारताविरूद्ध १९९० साली लॉर्ड्सच्या मैदानावर द्विशतक आणि शतक केलं होतं.
कसोटीच्या दोन्ही डावांमध्ये शतकं करणारा शुबमन गिल हा तिसरा भारतीय कर्णधार ठरला आहे. शुबमन गिलपूर्वी सुनील गावस्कर आणि विराट कोहली यांच्या नावावर हा विक्रम होता. तर कसोटीतील दोन्ही डावात शतकं करणारा तो जगातील सातवा फलंदाज ठरला आहे. त्याच्याआधी सुनील गावस्कर, विराट कोहली, विजय हजारे, जॅकी मॅकग्लू, ग्रेग चॅपेल, एलिस्टर कुक, स्टीव्हन स्मिथ आणि धनंजय डीसिल्वा
कसोटीच्या दोन्ही डावांमध्ये शतकं करणारे भारतीय कर्णधार
सुनील गावस्कर वि. वेस्ट इंडिज, १९७८
विराट कोहली वि. ऑस्ट्रेलिया, २०१४
शुबमन गिल वि. इंग्लंड, २०२५