Shubman Gill First Century as Test Captain: इंग्लंड दौऱ्यासह भारतीय क्रिकेटच्या नव्या पर्वाला सुरूवात झाली आहे. भारताचा नवा कर्णधार शुबमन गिलच्या खांद्यावर टीम इंडियाच्या नेतृत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. पहिल्याच सामन्यात नवा कर्णधार शुबमन गिलने शतक झळकावलं आहे. यशस्वी जैस्वालचं शतक, त्यानंतर शुबमन गिलची शतकी खेळी आणि ऋषभ पंतच्या साथीने भारताने ३०० धावांचा पल्ला गाठला. भारतीय संघाने पहिल्याच दिवशी मोठी धावसंख्या उभारली आहे.

शुबमन गिलने पहिल्या कसोटी सामन्याची नाणेफेक गमावली आणि संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला. पण भारताच्या फलंदाजांनी लीड्सच्या खडतर खेळपट्टीवर चांगली फलंदाजी केली. राहुल-यशस्वीने ९१ धावांची भागीदारी रचत संघाला चांगली सुरूवात करून दिली. यानंतर दुसऱ्या सत्रात यशस्वी जैस्वालने शानदार शतक झळकावत टीम इंडियाला सामन्यात पुढे ठेवलं. जैस्वाल बाद झाल्यानंतर गिलने ऋषभ पंतच्या साथीने संघाचा डाव सावरला. गिलने शानदार सुरूवात करत झटपट आपले अर्धशतक झळकावले.

शुबमन गिलने १३९ चेंडूत १४ चौकारांसह १०३ धावा करत आपलं शतक पूर्ण केलं. यासह तो पदार्पणात शतक झळकावणाऱ्या भारतीय कर्णधारांच्या खास यादीत आपलं नाव नोंदवण्यात यशस्वी ठरला. शुबमन गिलच्या शतकानंतर ऋषभ पंतनेही त्याचं अर्धशतक पूर्ण केलं. पंतने ९२ चेंडूत ५ चौकार आणि एका षटकारासह ५२ धावा करत अर्धशतक पूर्ण केले.

भारताचा कसोटी कर्णधार म्हणून पदार्पणात शतक झळकावणारे फलंदाज

१६४* विजय हजारे वि. इंग्लंड, दिल्ली १९५१
११६ सुनील गावस्कर वि. न्यूझीलंड, ऑकलंड १९७६
११५ विराट कोहली वि. ऑस्ट्रेलिया, अॅडलेड २०१४
१०२* शुबमन गिल वि. इंग्लंड, हेडिंग्ले २०२५

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इंग्लंडमध्ये कसोटीत शतक झळकावणारे भारतीय कर्णधार

मोहम्मद अझरुद्दीन (२)
विराट कोहली (२)
मन्सूर अली खान पतौडी (१)
सौरव गांगुली (१)
शुबमन गिल (१)