Vikram Solanki On Gujrat Titans Captaincy : गुजरात टायटन्सचे शीर्ष अधिकारी आणि माजी क्रिकेटर विक्रम सोलंकी यांनी त्यांच्या संघाबाबत आणि खेळाडूंविषयी मोठी भविष्यवाणी केली आहे. संघाच्या निर्देशक पदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या सोलंकी यांनी म्हटलं की, सलामीवीर फलंदाज शुबमन गिलला खेळाविषयी चांगलं ज्ञान आहे. तो गुजरात टायटन्सचा भविष्यातील कर्णधार होऊ शकतो. सध्या हार्दिक पांड्याकडे गुजरात टायन्सचं नेतृत्व आहे. त्यामुळे सोलंकी यांनी पांड्याला एकप्रकारे इशाराच दिला असल्याची चर्चा क्रिडाविश्वात रंगली आहे.

मागील वर्षी गुजरात टायटन्सला हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात आयपीएलमध्ये जेतेपद मिळालं होतं. पण आता पांड्याने त्याचं कर्णधार पक्क समजू नये, कारण सोलंकी यांच्या भविष्यवाणीमुळं पांड्याला एकप्रकारे सूचक इशाराच दिला असल्याचं बोललं जात आहे. गिल मैदानात धावांचा पाऊस पाडत असल्याने क्रिकेटविश्वात त्याने जबरदस्त छाप पाडली आहे. दरम्यान, हार्दिक पांड्याचं दुसऱ्या सत्रात गुजरात टायटन्सचं नेतृत्व करणं निश्चित आहे. पण संघ व्यवस्थापन गिलला भविष्यातील कर्णधाराच्या रुपात पाहत आहेत.

kl rahul
IPL 2024 : लखनऊसमोर आज चेन्नईचे आव्हान
chess candidates 2024 nepomniachtchi beats vidit gujrathi
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा : गुकेशची दुसऱ्या स्थानी घसरण’ विदितला नमवत नेपोम्नियाशी आघाडीवर; नाकामुराकडून प्रज्ञानंद पराभूत
IPL 2024 Punjab Kings vs Mumbai Indians Match Updates in Marathi
IPL 2024: मुंबईनं पंजाबच्या तोंडचा घास पळवला
IPL 2024 Punjab Kings vs Mumbai Indians Match Updates in Marathi
IPL 2024: रोहित शर्माने तोडला पोलार्डचा मोठा विक्रम, मुंबईसाठी हा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज

नक्की वाचा – IPL मध्ये ‘या’ तीन दिग्गज खेळाडूंनी एकही षटकार ठोकला नाही; नाव वाचून तुम्हीही व्हाल थक्क

सोलंकी यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं की, “एका खेळाडूमध्ये नेतृत्व करण्याची क्षमता आहे, तो खूप जबाबदारीने खेळतो. तुमच्या नावावर कर्णधारपदाचं चिन्ह लागल्यावरच तुम्ही तुमची भूमिका पार पाडायची असते, हे मला जास्त महत्वाचं वाटत नाही. शुबमनने मागच्या वर्षीही त्याच्या कलाकौशल्यातून आणि खेळाच्याप्रती चांगलं प्रदर्शन सादर केलं होतं. मला असं वाटतं की, शुबमन भविष्यातील कर्णधार असू शकतो. याबाबत अधिकृतपणे निर्णय घेतलेला नाहीय. शुबमनकडे नेतृत्व करण्याचे गुण आहेत. तो खूप परिपक्व आहे आणि प्रतिभावंत आहे. त्याच्याकडे क्रिकेट खेळण्याची खूप चांगली शैली आहे. आम्ही शुबमनसोबत चर्चा सुरुच ठेऊ. आम्ही जो कोणताही निर्णय घेऊ, त्यावेळी त्याच्याशी चर्चा करू.” गुजरात टायटन्स आयपीएलमध्ये त्यांचा पहिला सामना ३१ मार्चला चेन्नई सुपर किंग्ज विरोधात खेळणार आहे.