अत्यंत अटीतटीच्या झालेल्या बिर्ला ‘नवोदित मुंबई-श्री’च्या जेतेपदावर फिटनेस मॅजिकच्या सिद्धांत जैसवालने आपले नाव कोरले. चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्सच्या लढतीत सिद्धांतला अमित सिंग आणि विशाल गावडे यांनी चांगलीच टक्कर दिली, पण अखेर जैसवालने विजयाचा सिद्धांत लिहिला. या वेळी सर्वोत्तम शरीरप्रदर्शनाचा (बेस्ट पोझर) पुरस्कार  ५५ किलो वजनी गटातील तेजस धामणेला देण्यात आला. बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटना आणि मुंबई उपनगर शरीरसौष्ठव संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

नवोदित मुंबई श्री स्पर्धेचा निकाल
५५ किलो : १ .तेजस धामणे (भारत जिम), २. विवेक घाडीगावकर (शिवसम्राट), ३. सौरभ पेडणेकर (स्टील बॉडी).
६० किलो : १. कमलेश िशदे (ओम दत्तात्रय), २. नयन देवळेकर (डन वाय फिटनेस), ३. रोहित तांबे (मॅक्स मसल).
६५ किलो : १. अजय पुंडीर (आर.एम.भट), २. पंकज दुधगावकर (श्री साई समर्थ), ३. जयेश पाटील (बॉडी वर्पशॉप).
७० किलो : १. अमित सिंग (आर.एम.भट), २. राहुल डोईफोडे (स्वामी समर्थ), ३. कुमार पेडणेकर (माय फिटनेस).
७५ किलो : १. विशाल गावडे (व्ही फिटनेस), २. सिद्धांत यादव (गुप्ता जिम), ३. दर्शन पाचील (मुंबई फिटनेस).
७५ किलोवरील : १. सिद्धांत जैसवाल (फिटनेस मॅजिक), २. विक्रमजीत सिंग (मुंबई फिटनेस), ३. विग्नेस पंडित (भारत जिम)
बेस्ट पोझर : तेजस धामणे (भारत जिम).