scorecardresearch

Premium

Asian Games 2023: सिफ्ट कौरने विश्वविक्रमासह जिंकले सुवर्णपदक, ५० मीटर थ्री पोझिशन रायफलमध्ये भारताने नोंदवली हॅटट्रिक

Sift Kaur wins gold medal: आशियाई क्रीडा २०२३ मध्ये भारताच्या खात्यात आणखी एक सुवर्ण आले. यावेळी सिफ्ट कौरने नेमबाजीतून देशाला पाचवे सुवर्णपदक जिंकून दिले.

Sift Kaur won the country's 5th gold medal in shooting at Asian Games 2023
सिफ्ट कौर साम्राने जिंकले सुवर्णपदक (फोटो-इंडिया ऑल स्पोर्टस ट्विटर)

Sift Kaur wins gold medal in shooting: भारताच्या खात्यात आणखी एका सुवर्णपदकाची भर पडली आहे. सिफ्ट कौरने ५० मीटर रायफल स्पर्धेत देशासाठी पाचवे सुवर्ण जिंकले आहे. याच स्पर्धेत चीनने दुसरे स्थान मिळवत रौप्यपदक जिंकले. तर भारताच्या आशीने ५० मीटर रायफल प्रकारात तिसरे स्थान मिळवून कांस्यपदक जिंकले. आज चौथ्या दिवशी भारताचे हे दुसरे सुवर्णपदक आहे.

सिफ्ट कौरने केला विश्वविक्रम, आशीचे रौप्यपदक हुकले –

५० मीटर रायफल प्रकारात सुवर्णपदक जिंकणाऱ्या सिफ्ट कौरने ४६९.६ गुणांसह विश्वविक्रम केला. या विक्रमासह तिने ४६२.३ गुणांसह चीनच्या झांग क्विओंग्यूचा पराभव केला. अशा प्रकारे सिफ्टने मोठ्या फरकाने सुवर्ण जिंकले. त्याचबरोबर आशी चोक्सीने ४५१.९ गुणांसह कांस्यपदक जिंकले. आशीच्या खराब शॉटने तिला रौप्यपदकापासून दूर ठेवले, त्यानंतर तिला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

भारताने जिंकले पाचवे सुवर्णपदक –

हळूहळू भारताच्या सुवर्णपदकांची संख्या वाढत आहे. सिफ्ट कौरने चौथ्या दिवशी भारतासाठी एकूण पाचवे आणि दुसरे सुवर्णपदक जिंकले. यापूर्वी मनू भाकर, ईशा सिंग आणि रिदम संगवान यांच्या महिला संघाने २५ मीटर पिस्तुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते, जे देशाचे एकूण चौथे सुवर्ण आणि आजचे पहिले सुवर्ण होते.

हेही वाचा – Cricket World Cup: पाऊस जेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या विजयाचा घास हिरावतो

भारताने सांघिक स्पर्धेतही रौप्यपदक पटकावले –

याआधी, सिफ्ट, आशी आणि मानिनी कौशिक यांनीही महिलांच्या ५- मीटर रायफल ३ पोझिशनमध्ये सांघिक स्पर्धेत रौप्य पदक जिंकले होते. आशी, मानिनी आणि सिफ्ट या त्रिकुटाने पात्रता फेरीत १७६४ गुणांसह दुसरे स्थान पटकावले. यजमान चीनने एकूण १७७३ गुणांसह सुवर्णपदक जिंकले तर दक्षिण कोरियाने एकूण १७५६ गुणांसह कांस्यपदक जिंकले. सिफ्ट आणि आशी यांनी अनुक्रमे दुसरे आणि सहावे स्थान मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला. सिफ्टने ५९४गुण मिळवले जे पात्रता मध्ये एक नवीन आशियाई संयुक्त विक्रम आहे.

पहिले सुवर्ण फक्त शूटिंगमध्ये आले –

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला पहिले सुवर्णपदक नेमबाजीतच मिळाले होते. भारताने दुसऱ्या दिवशी पहिले सुवर्णपदक जिंकले. यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघाने देशासाठी दुसरे सुवर्णपदक जिंकले. त्यानंतर घोडदळ संघाच्या माध्यमातून तिसरे सुवर्णपदक मिळाले. आतापर्यंत भारताला दोन सुवर्णपदके मिळाली आहेत. आज भारताने नेमबाजीतच दोन्ही सुवर्णपदके जिंकली आहेत. प्रथम मनू भाकर, ईशा सिंग आणि रिदम संगवान या त्रिकुटाने आश्चर्यकारक कामगिरी केली आणि नंतर सिफ्ट कौरने दुसरे सुवर्णपदक जिंकले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sift kaur won the countrys 5th gold medal in shooting at asian games 2023 vbm

First published on: 27-09-2023 at 13:33 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×