Sir Andy Roberts said that the Indian team has developed an ego: पुढील महिन्यात भारतीय क्रिकेट संघाला दोन कसोटी, तीन वनडे आणि पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जायचे आहे. या वेस्ट इंडिज दौऱ्याला १२ जुलैपासून सुरुवात होणार आहे. तत्पुर्वी माजी कॅरेबियन दिग्गज सर अँडी रॉबर्ट्स यांनी भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्यापूर्वी एक मोठे वक्तव्य केले आहे. त्यांच्या मते, भारतीय क्रिकेट संघात अहंकार निर्माण झाला आहे.

डबल्यूटीसी स्पर्धेच्या दुसऱ्या हंगामाच्या अंतिम सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध २०९ धावांनी पराभव पत्कारावा लागला. यानंतर वेस्ट इंडिजच्या दौऱ्यापूर्वी माजी कॅरेबियन दिग्गज सर अँडी रॉबर्ट्स यांनी भारतीय पुरुष क्रिकेट संघावर टीका केली आहे. सर अँडी रॉबर्ट्स म्हणाले की, भारतीय संघात अहंकार निर्माण झाला आहे.

मिड-डेने अँडी रॉबर्ट्सच्या हवाल्याने म्हटले आहे की, “भारतीय क्रिकेटमध्ये हा अहंकार पसरला आहे आणि याद्वारे भारताने उर्वरित जगाला कमी लेखले आहे. भारताने त्यांचे लक्ष काय आहे हे ठरवायचे आहे. कसोटी क्रिकेट की मर्यादित षटकांचे क्रिकेट. टी-२० क्रिकेट आपला मार्ग चालवेल. तिथे बॅट आणि बॉलमध्ये स्पर्धा नाही.”

हेही वाचा – WTC Final 2023: “निवृत्ती घेईन तेव्हा मला पश्चाताप होईल की…”; डब्ल्यूटीसी फायनलबद्दल आर आश्विनने सोडले मौन

वेस्ट इंडिजच्या रॉबर्ट्स यांनी सांगितले की भारताकडे काही चांगले खेळाडू आहेत, परंतु त्यांनी घराबाहेर चांगली कामगिरी केलेली नाही. रॉबर्ट्स म्हणाले, “मला अपेक्षा होती की भारत त्यांच्या फ फलंदाजीतील ताकद दाखवेल. मला अंतिम फेरीत कोणतेही चमकदार स्पॉट्स दिसले नाहीत. अजिंक्य रहाणेने कठोर संघर्ष केला असला तरी त्याच्या हाताला दुखापत झाली. शुबमन गिल जेव्हा शॉट्स खेळतो तेव्हा तो चांगला दिसतो. पण तो लेग स्टंपवर उभा राहतो आणि अनेकदा बोल्ड किंवा यष्टीच्यामागे झेलबाद होतो.”

रॉबर्ट्स पुढे म्हणाले, “त्याचे हात चांगले आहेत, पण त्याने (विराट कोहली) चेंडूच्या मागे जायला हवे. पहिल्या डावात मिचेल स्टार्ककडून एक शानदार चेंडू पाहिला मिळाला. भारताकडे काही चांगले खेळाडू आहेत, पण ते विश्वसनीय नाहीत. त्यांनी मायदेशातून बाहेर विश्वासार्ह कामगिरी केलेली नाही.”

हेही वाचा – MPL 2023: सलामीच्या सामन्यात पुणेरी बाप्पाचा कोल्हापूर टस्कर्सवर ८ विकेट्सने दणदणीत विजय, ऋतुराज गायकवाडचे वेगवान अर्धशतक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रॉबर्ट्सने भारताचा टॉप ऑर्डरचा कसोटी गोलंदाज आणि अव्वल ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनला न खेळवल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. ते म्हणाले, “अश्विनला वगळणे हास्यास्पद होते. तुम्ही तुमचा सर्वोत्तम स्पिनर कसा निवडू शकत नाही?”