Sourav Ganguly insensitive comment on Kolkata doctor rape murder case : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली वादात सापडला आहे. कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणातील वक्तव्य आणि सोशल मीडियावर आलेल्या प्रतिक्रियांमुळे ट्रोल होत आहेत. यानंतर आता सौरव गांगुलीने पीडितेच्या समर्थनार्थ आपली एक्स प्रोफाईल बदलली आहे पण यानंतर त्याला टीकेला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे त्याने काय वादग्रस्त वक्तव्य केले होते? ज्यामुळे त्याला आता निवेदन जारी करावे लागले आहे.

आता कर्णधार सौरव गांगुलीने आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या क्रूर बलात्कार आणि हत्येविरोधात आवाज उठवला आहे. त्याने या घटनेच्या निषेधार्थ आणि न्यायाची मागणी करत असलेल्या लोकांच्या एकजुटीने सोशल मीडियावरील आपले प्रोफाइल पिक्चर्स ‘ब्लॅक’ केले आहेत. कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर संतापाची लाट उसळली आहे आणि एक ऑनलाइन मोहीम सुरू झाली आहे. ज्यात लोकांना निषेध म्हणून त्यांचे सोशल मीडिया प्रोफाइल पिक्चर्स ‘ब्लॅक’ करण्याचे आवाहन केले आहे.

कोलकात्याच्या सुरक्षेबाबत केलेल्या वक्तव्यावर झालेल्या टीकेनंतर सौरव गांगुलीने आपला डीपी ब्लॅक केला आहे. या अगोदर त्याने जे वक्तव्य केले होते. ज्यामुळे सोशल मीडियावर त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. त्याचे वक्तव्य हे गुन्ह्याचे गांभीर्य कमी करणारे असल्याचे चाहत्यांचे म्हणणे होते. रविवारी गांगुलीने स्पष्टीकरण जारी करत आपले विधान चुकीच्या अर्थाने घेतले असल्याचे म्हटले. त्याचबरोबर तो स्वत: एका मुलीचा वडील असल्याने या घटनेबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली.

हेही वाचा – Yuvraj Singh Biopic: वर्ल्डकप हिरो ते कर्करोगावर मात; युवराज सिंगच्या बायोपिकची घोषणा, मोठ्या पडद्यावर येणार सिक्सर किंगचा प्रेरणादायी प्रवास

सौरव गांगुलीने कठोर शिक्षा देण्याची मागणी केली –

सौरव गांगुली निवेदन जारी करताना म्हणाला, “मला माहित नाही की मी गेल्या रविवारी काय बोललो होतो, ते कसे मांडले गेले आणि त्याचा काय अर्थ घेण्यात आला. पण माझ्या विधानाचा हेतू चुकीचा नव्हता. ही एक अत्यंत लज्जास्पद आणि भयंकर घटना आहे, हे मी आधीही सांगितले आहे. आता सीबीआय आणि पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मला आशा आहे की सीबीआयने दोषींना शोधल्यानंतर त्यांना कठोर शिक्षा दिली जाईल. शिक्षा अशी असावी की आयुष्यात पुन्हा असा गुन्हा करण्याचे धाडस कोणी करू नये. अशा प्रकारची कठोर शिक्षा दिली पाहिजे.”

हेही वाचा – Pat Cummins: भारताविरुद्ध ग्रीन, मार्शने गोलंदाजीत अधिक जबाबदारी घेणे अपेक्षित – कमिन्स

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या वक्तव्यामुळे सौरव गांगुलीवर टीका –

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये गांगुली म्हणाला होता की, या घटनेमुळे पश्चिम बंगाल किंवा संपूर्ण देशाच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केले जाऊ नये. तो म्हणाला, “मला वाटत नाही की या एका घटनेवरून सर्व काही किंवा प्रत्येकजण सुरक्षित नाही, असा विचार करणे चुकीचे आहे. अशा घटना जगभर घडत असतात. त्यामुळे मुली सुरक्षित नाहीत, असा विचार करणे चुकीचा आहे. केवळ पश्चिम बंगालमध्येच नाही तर संपूर्ण भारतात महिला सुरक्षित आहेत. आपण जिथे राहतो ते सर्वोत्तम ठिकाण आहे. एका घटनेवरून कुणालाही दोष देऊ नये.”