scorecardresearch

Premium

World Cup 2023: दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमा कॅप्टनच्या भेटीत झोपला? फोटो व्हायरल झाल्याने सोशल मीडियावर मीम्सचा पूर

ICC World Cup 2023: ‘कॅप्टन डे’च्या दिवशी विश्वचषक सुरु होण्याच्या एक दिवस आधी कर्णधाराच्या फोटो सेशन दरम्यान दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाला झोप लागली. यानंतर त्याने यावर स्पष्टीकरण दिले आहे.

South African captain Temba Bavuma slept in captain's meeting as the photo went viral memes flooded social media
'कॅप्टन डे’च्या दिवशी कर्णधाराच्या फोटो सेशन दरम्यान दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाला झोप लागली. सौजन्य- (ट्वीटर)

ICC World Cup 2023: दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाचा एक फोटो ४ ऑक्टोबरला वर्ल्ड कपपूर्वी झालेल्या (कॅप्टन डे) कर्णधाराच्या भेटीदरम्यान व्हायरल झाला होता. व्हायरल झालेल्या छायाचित्रात टेंबा बावुमा कर्णधाराच्या भेटीदरम्यान इतर संघांच्या कर्णधारांबरोबर खुर्चीवर बसलेला दिसत आहे. या फोटोत बावुमा झोपलेला दिसत आहे. यावर स्वतः बावुमाने स्पष्टीकरण दिले आहे. जोपर्यंत दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधाराने स्वत: या प्रकरणी स्पष्टीकरण दिले नाही तोपर्यंत सर्वांना वाटले की तो झोपला आहे.

‘कॅप्टन डे’च्या भेटीदरम्यान छायाचित्र शेअर करत इंग्लंडच्या बर्मी आर्मीने लिहिले की, “वर्ल्ड कप कॅप्टन कॉन्फरन्समध्ये टेंबा बावुमा झोपी गेला.” टेम्बा बावुमाने या पोस्टला उत्तर देताना म्हटले, “मी कॅमेरा अँगलला दोष देतो, मला झोप येत नव्हती. त्यांनी फोटो वेगळ्यापद्धतीने घेतला.”

Kevin Sinclair cartwheel
क्रिकेटच्या मैदानावर कोलांटउड्या सेलिब्रेशन व्हायरल; वेस्ट इंडिजच्या केव्हिन सिनक्लेअरची धमाल
India dominated the first day of India first Test match against England
पहिल्या दिवशी भारताचा दबदबा! फिरकीपटूंनी इंग्लंडला २४६ धावांत रोखले; यजमानांच्या १ बाद ११९ धावा
Sai Sudarshan to replace Virat Kohli for the two Tests against England
IND vs ENG : विराट कोहलीच्या जागी खेळणार ‘हा’ खेळाडू? आकाश चोप्राने सुचवलेल्या नावावर फक्त शिक्कामोर्तब होणे बाकी
sania-shoaib
शोएब मलिकमध्ये नेमकं काय पाहिलं? शाहरुखच्या प्रश्नाला उत्तर देतानाचा सानिया मिर्झाचा जुना व्हिडीओ चर्चेत

लोकांच्या अपेक्षेच्या विरुद्ध, २०२३च्या विश्वचषक स्पर्धेत उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला नव्हता आणि १० संघांच्या कर्णधारांच्या फोटो सेशनसह फक्त ‘कॅप्टन डे’ आयोजित करण्यात आला होता. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील लढतीने ५ ऑक्टोबरपासून विश्वचषक २०२३ची सुरुवात होत आहे.

दक्षिण आफ्रिकेची नजर असणार पहिल्या विश्वचषकाच्या विजेतेपदाकडे

दक्षिण आफ्रिकेच्या संघाने आपले प्रमुख वेगवान गोलंदाज ऑनरिक नॉर्खिया आणि सिसांडा मगाला यांच्याशिवाय विश्वचषकात प्रवेश केला आहे, जे दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. मात्र, टेंबा बावुमाच्या संघाला योग्य वेळी लय सापडली आहे. त्यामुळे या विश्वचषकात ते कशी कामगिरी करतात हे, पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

गेल्या महिन्यात, दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिले दोन एकदिवसीय सामने गमावल्यानंतर पुनरागमन केले आणि ५ सामन्यांची मालिका ३-२ अशी जिंकली आणि शेवटचे तीन सामने १०० हून अधिक धावांच्या फरकाने जिंकले. दक्षिण आफ्रिकेचा विश्वचषकातील पहिला सामना ७ ऑक्टोबर रोजी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्ध होणार आहे. विश्वचषकाच्या सराव सामन्यात न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा डकवर्थ लुईस पद्धतीने ७ धावांनी पराभव केला.

हेही वाचा: World Cup 2023: वर्ल्डकप २०२३पूर्वी आर. अश्विनचे आश्चर्यचकित करणारे विधान; म्हणाला, “गंभीरला जेवढे श्रेय हवे होते…”

तिरुअनंतपुरम येथे खेळल्या गेलेल्या सराव सामन्यात प्रथम खेळताना न्यूझीलंडने डेव्हॉन कॉनवे (७३ चेंडूत ७८ धावा) आणि टॉम लॅथम (५६ चेंडूत ५२ धावा) यांच्या अर्धशतकांच्या बळावर ५० षटकांत ६ बाद ३२१ धावा केल्या. ). दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एनगिडी आणि मार्को जॅन्से यांनी ३-३ विकेट्स घेतल्या. पावसामुळे दक्षिण आफ्रिकेला डीएलएस पद्धतीने विजयासाठी ३७ षटकांत २१९ धावांचे लक्ष्य मिळाले. दक्षिण आफ्रिकेने जोरदार प्रत्युत्तर दिले परंतु ३७ षटकात २११/४ धावाच करता आल्या. विश्वचषकानंतर एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या क्विंटन डी कॉकने ८९ चेंडूत ८४ धावा केल्या. रॅसी व्हॅन डर डुसेननेही ५१ धावांची अर्धशतकी खेळी खेळली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: South african captain temba bavuma fell asleep in the captains meet clarification given after picture went viral avw

First published on: 05-10-2023 at 14:30 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×