Gambhir Sreesanth fight: भारताचे दोन माजी क्रिकेटपटू श्रीसंत आणि गौतम गंभीर यांच्यातील वाद थांबायचे नाव काही घेत नाहीये. सोशल मीडियावर दोन्ही जण एकमेकांविरुद्ध लिहित आहेत. श्रीसंतच्या विधानावर गंभीरची गूढ पोस्ट समोर येते, त्याला प्रत्युतर म्हणून श्रीसंतने आणखी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे आणि थेट सामन्यादरम्यान गंभीरने मैदानाच्या मध्यभागी काय म्हटले होते ते सांगितले, ज्यामुळे प्रकरण आणखीनच चिघळले होते. श्रीसंतच्या म्हणण्यानुसार, “गंभीरने त्याला ‘तू फिक्सर है…तू फिक्सर है’ म्हणत अपशब्द बोलला.” श्रीसंत म्हणाला की, “मी गंभीरला काहीही बोललो नाही आणि फक्त तो का रागावला आहे असे विचारत होता.”

श्रीसंतने मोठा खुलासा केला आहे

श्रीसंत म्हणाला, “गुजरात जायंट्स आणि इंडिया कॅपिटल्स यांच्यातील लिजेंड्स लीग क्रिकेट सामन्यादरम्यान गौतम गंभीर मला जे काही अपशब्द बोलला ते मी उघडपणे सांगितले आहे.” श्रीसंतने आपल्या नवीन व्हिडीओमध्ये म्हटले आहे की, “अनेक चॅनल मला कॉल करत आहेत आणि माझ्याकडून मैदानावर काय घडले ते जाणून घ्यायचे आहे. मी अशा प्रकारची व्यक्ती नाही जी पीआर (जनसंपर्क) मध्ये खूप पैसे खर्च करते आणि चुकीच्या गोष्टी पसरवते. म्हणूनच मी थेट येत आहे आणि तुमच्याशी बोलत आहे. मला प्रत्येक वृत्तवाहिनीवर त्याच गोष्टीची पुनरावृत्ती करायची नाही.”

श्रीसंतचा गौतमवर ‘गंभीर’ आरोप

श्रीसंत पुढे म्हणाला, “आम्हाला माहित आहे की तो (गंभीर) किती शक्तिशाली आहे आणि तो पीआरवर किती खर्च करू शकतो. मी एक सामान्य माणूस आहे, ज्याने माझ्या कुटुंबासाठी आणि इतर सर्व गोष्टींसाठी एकट्याने लढा दिला आहे. त्यामध्ये तुम्हा सर्वांचेही सहकार्य लाभले आहे. जगासमोर लाइव्ह टीव्हीवर तो मला फिक्सर फिक्सर म्हणत राहिला. मी त्याला एकही वाईट शब्द बोललो नाही. मी त्याला कोणताही आक्षेपार्ह शब्द वापरला नाही. मी फक्त त्याला विचारले, ‘तू मला काय सांगत आहेस?’हे मी हसत विचारात होतो कारण, तो मला पुन्हा पुन्हा फिक्सर म्हणत होता. त्यामुळे माझा संयम देखील सुटला आणि मी त्याच्यावर चिडलो आणि म्हणालो, ‘तू फायटर आहेस.’ मात्र, त्यावेळी देखील त्याला वाईट शब्द बोललो नाही.”

अंपायरशी वाईट भाषेत बोलला

श्रीसंत अंपायरबाबत म्हणाला, “अंपायर गौतमला समजवून सांगण्याचा प्रयत्न करत असतानाही तो असेच शब्द वापरत होता. कदाचित त्यांचा पीआर खूप मजबूत असेल, पण मी प्रत्येक चॅनलवर येऊन तेच सांगू शकत नाही. म्हणूनच मी थेट आलो आहे आणि तुम्हाला संपूर्ण सत्य सांगितले आहे. सोशल मीडियावर जर माझ्याविरोधातील कोणताही व्हिडीओ व्हायरल होत असेल, तर त्याची प्रतिमा जपण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, हे समजावे. मी माझ्या बाजूने एकही शब्द किंवा शिवीगाळ केली नाही.”

तो पुढे म्हणाला, “गंभीर फक्त माझ्याबरोबरच असे करत नाही तर, अनेक लोकांबाबतीत असे वागतो. त्यांनी हे का सुरू केले, ते मला माहित नाही. विकेट पडल्यावर ब्रेकच्या वेळीही तो माझ्याशी काही शब्द बोलत राहिला. त्याच्या पीआर टीमने सिक्सर-सिक्सरने काहीतरी बोलल्याचा संदेश सोशल मीडियावर लोकांनी पसरवला, पण तो तसा बोलला नाही. गंभीर म्हणाला, ‘तू फिक्सर आहेस.’ हे बोलला. ते बोलण्याचा त्याला अधिकार नाही. मला हवे असल्यास मी त्याच्यावर पुढील कायदेशीर कारवाई करू शकतो. मात्र, मला हे प्रकरण संपवायचे आहे, परंतु त्याचे लोक त्याचे प्रतिमा जपण्यासाठी मला टार्गेट करत आहेत.”

हेही वाचा: LLC 2023 : “मैदानावर त्याने जे शब्द वापरले, ते मी…”, गौतम गंभीरशी झालेल्या वादावर श्रीसंतने दिली प्रतिक्रिया, पाहा VIDEO

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याआधी गंभीरने सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये त्याने कोणाचेही नाव घेतले नसून, हे श्रीसंतला दिलेले उत्तर मानले जात आहे. गंभीरने गुरुवारी सकाळी ११:३० वाजता ट्वीटरवर एक पोस्ट टाकली, ज्यामध्ये तो टीम इंडियाच्या जर्सीत आहे आणि हसत आहे. गंभीर भारतीय संघात खेळत असतानाचे हे चित्र आहे. त्याने त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले, “स्माईल! जेव्हा जगातील लोक फक्त लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत असतात तेव्हा दुर्लक्ष करायचे असते.” दोघांमधील हा वाद सोशल मीडियावर असाच सध्या सुरु आहे.