Football Match Incident In Salvador : साल्वाडोर देशात एका फुटबॉल सामन्यात एक भयानक घटना घडल्याने क्रिडाविश्वात खळबळ उडाली आहे. फुटबॉलचा सामना असल्यावर स्टेडियममध्ये हजारोंच्या संख्येत प्रेक्षकांची वर्दळ असते. पण येथील एका मैदानात फुटबॉलचा सामना फक्त १६ मिनिटे रंगला आणि त्यानंतर मैदानात लोकांमध्ये चेंगराचेंगरी झाली. या दुर्देवी घटनेत १२ जणांचा मृत्यू झाला असून ५०० लोक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या भयानक घटनेमुळं साल्वाडोरमध्ये हाहाकार उडाला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असं की, लोकांमध्ये चेंगराचेंगरी झाल्याची ही घटना मोनूमेंटल स्टेडियममध्ये घडली. या स्टेडियममध्ये देशांतर्गत फुटबॉल सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. एलियांचा क्लब आणि एफएएस क्लब यांच्यात हा सामना रंगला होता. मात्र, मैदानात अचानक घावपळ उडाल्याने प्रेक्षकांमध्ये चेंगराचेंगरी झाली. या स्टेडियममधून तब्बल ४४८३६ प्रेक्षक सामना पाहू शकतात.

10 Year Old Girl Dies of Cake Due To Artificial Sweetener
१० वर्षांच्या मुलीच्या मृत्यूचं कारण ठरलेल्या केकमध्ये ‘हा’ पदार्थ झाला होता जास्त; तुम्हीही व्हा सावध, हे त्रास ओळखा
Malaysia Military Helicopters Crash
मलेशियामध्ये दोन लष्करी हेलिकॉप्टरची हवेत भीषण धडक; १० जणांचा मृत्यू, घटनेचा व्हिडीओ समोर
dubai rain (1)
दुबईतील पूरस्थितीला कृत्रिम पाऊसच ठरला का कारणीभूत?
man killed in dispute between two groups over trivial reason in thane
ठाणे : क्षुल्लक कारणावरून दोन गटातील वादातून एकाची हत्या

नक्की वाचा – रोहित शर्माच्या खराब फॉर्मबाबत रवी शास्त्री यांनी दिली मोठी प्रतिक्रिया, म्हणाले, “तो फक्त दोन-तीन चेंडू…”

मात्र, हा सामना पाहण्यासाठी लोकांची एकच गर्दी झाली होती. चहुबाजूनं लोकं असल्याने स्टेडियम भरगच्च भरलं होतं. सामन्यादरम्यान लोकांमध्ये एकच गोंधळ उडाला. त्यामुळे हा सामनात १६ मिनिटेच सुरु राहिला. लोकांमध्ये अचानक पळापळ झाल्याने चेंगराचेंगरीची दुर्देवी घटना घडली. यामध्ये १०० लोकांना तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.