Rinku Singh Received Threat: दुबईत झालेल्या आशिया चषक २०२५ स्पर्धेत भारतीय संघाने बाजी मारली होती. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये या स्पर्धेतील अंतिम सामना पार पडला होता. या स्पर्धेतील शेवटच्या सामन्यासाठी रिंकू सिंगला प्लेइंग ११ मध्ये स्थान दिलं गेलं होतं. या सामन्यात रिंकूने शेवटच्या चेंडूवर चौकार मारून भारताला विजय मिळवून दिला होता. आता रिंकू वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे.

रिंकू सिंगला अंडरवर्ल्डकडून धमक्या येत आहेत. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी दोन आरोपींना अटक केल्याची माहिती समोर येत आहे.रिंकू सिंग आगामी रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या सरावासाठी कानपूरमध्ये आहे. कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियममध्ये सराव करत असताना त्याला अंडरवर्ल्डकडून धमकी आली आहे. माध्यमातील वृत्तानुसार, डी कंपनीने रिंकू सिंगकडे ५ कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली आहे.

मुंबई गुन्हे शाखेने याबाबत तपास केला असता, ही धमकी डी कंपनीने दिली असल्याची माहिती समोर येत आहे. फेब्रुवारी ते एप्रिल २०२५ या कालावधीत रिंकू सिंगच्या प्रमोशनल टीमला ३ धमकी देणारे मेसेज आल्याची देखील माहिती समोर येत आहे. यावर्षी रिंकू सिंगला ३ धमकी देणारे मेसेज आल्याची माहिती समोर येत आहे. डी कंपनीने रिंकू सिंगकडे ५ कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली आहे. धमकी देणाऱ्या दोघांनाही अटक करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं मोहम्मद दिलशाद आणि मोहम्मद नवीद असं असल्याची माहिती समोर येत आहे.

.आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या रिंकू सिंगला आशिया चषक २०२५ स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान देण्यात आलं होतं. पण त्याला सुरुवातीचे सामने खेळण्याची संधी मिळाली नव्हती. अंतिम सामन्यात हार्दिक पंड्याला दुखापत झाल्यानंतर त्याला प्लेइंग ११ मध्ये खेळण्याची संधी मिळाली. ज्यावेळी तो फलंदाजीला आला, त्यावेळी भारतीय संघाला एका चेंडूत ३ धावा करायच्या होत्या. त्यावेळी रिंकू सिंगने चौकार मारून भारतीय संघाला विजय मिळवून दिला होता. यासह एक चेंडू खेळून तो भारतीय संघाच्या विजयाचा हिरो ठरला होता.