एअर इंडिया आणि बँक ऑफ इंडिया या संघांना उत्कर्ष क्रीडा मंडळाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पध्रेच्या साखळी सामन्यात पराभव पत्करावा लागला. भिवंडीमधील अरिहंत कंपाऊंड, पुर्णे येथील क्रीडांगणावर सुरू असलेल्या या स्पध्रेत आरसीएफ संघाने एअर इंडियाला २९-२८ असे चकवून बाद फेरीत दिमाखात प्रवेश केला.आनंद पाटील आणि संदेश पेकर यांच्या नेत्रदीपक चढाया आणि शरद पवारच्या भक्कम पकडींमुळे आरसीएफने हा विजय साकारला. एअर इंडियाच्या प्रशांत चव्हाण आणि दीपक झझोट यांनी पराभव टाळण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.
‘क’ गटात शुभम इंटरप्रायझेसने बँक ऑफ इंडियावर १९-१४ असा धक्कादायक विजय मिळवला. या पराभवामुळे बाद फेरी गाठण्याच्या त्यांच्या आशा धुसर झाल्या. मिलिंद पाटील आणि दिनेश पाटील यांनी शुभम संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण क्षेत्ररक्षणाची भूमिका बजावली. काशिराम म्हात्रेने दमदार चढायांचा खेळ केला. ‘ब’ गटात महिंद्रा आणि महिंद्राने गुरुकुलला १५-७ असे नमवले. महिंद्राकडून निलेश साळुंखे, ऋतुराज जाधव आणि सचिन पाटील यांनी शानदार खेळ केला. ‘ड’ गटात सेंट्रल बँकेने हेमंत डेकोरेटर्स संघाला ३८-३१ असे हरवले. विजयी संघाकडून सुमित पाटील, हेमंत म्हात्रे आणि यतीश पाटील यांनी उत्कृष्ट खेळ केला.
संग्रहित लेख, दिनांक 29th Nov 2014 रोजी प्रकाशित
राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा
एअर इंडिया आणि बँक ऑफ इंडिया या संघांना उत्कर्ष क्रीडा मंडळाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पध्रेच्या साखळी सामन्यात पराभव पत्करावा लागला.
First published on: 29-11-2014 at 05:44 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: State level kabaddi competition