कोलकाता नाइट रायडर्स संघाचा फिरकीपटू सुनील नरिनच्या वडिलांचे निधन झाले. ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत वेस्ट इंडिजच्या संघाचा
भाग नसलेला नरिन काही दिवसांपूर्वीच भारतात दाखल झाला. मात्र वडिलांचे निधन झाल्याने तो मायदेशी परतला असल्याचे नाइट रायडर्स संघाचे
मुख्य प्रशिक्षक जॅक कॅलिस यांनी सांगितले.
मायदेशी रवाना झाल्यामुळे नाइट रायडर्सच्या दिल्ली डेअर डेव्हिल्सविरुद्धच्या रविवारी होणाऱ्या लढतीला मुकण्याची शक्यता आहे. गोलंदाजीच्या शैलीत आवश्यक बदल करण्यासाठी नरिनने ट्वेन्टी-२० विश्वचषकातून माघार घेतली होती.
संग्रहित लेख, दिनांक 8th Apr 2016 रोजी प्रकाशित
सुनील नरिनला पितृशोक
कोलकाता नाइट रायडर्स संघाचा फिरकीपटू सुनील नरिनच्या वडिलांचे निधन झाले.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 08-04-2016 at 04:34 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunil narine