ट्वेन्टी-२० क्रिकेट म्हटलं की चौकार आणि षटकारांची बरसात. कमीत कमी चेंडूत जास्तीत जास्त धावा वसुल करण्याचा फलंदाजाचा मानस असतो. त्यातच आयपीएलमध्ये वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलच्या तुफान फटकेबाजीचा आनंद घेण्यासाठी चाहते नेहमी आतुर असतात. चेंडूला थेट स्टेडियमच्या बाहेर पोहोचविण्याची कुवत असलेल्या या फलंदाजाने आयपीएलमध्ये आजवर अनेकदा आपल्या वादळी खेळीने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मात्र, यंदाच्या आयपीएलमध्ये ख्रिस गेलच्या बॅटमधून धावाच निघालेल्या नाहीत. गेलची यंदा कामगिरी खूप सुमार राहिली. आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर असला तरी यंदाच्या पर्वात एका भारतीय फलंदाजाने सर्वाधिक चौकार आणि षटकार ठोकण्यात गेलला मागे टाकले आहे. गुजरात लायन्सचा कर्णधार सुरेश रैनाने आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार आणि चौकार ठोकणारा खेळाडू ठरला आहे.

सुरेश रैना (५७४)-

Rohit Sharma Is My Captain Not Other Guy Hardik Pandya
“रोहित शर्माच्या सल्ल्यावरच MI च्या खेळाडूंचा..”, इरफान पठाणने सांगितला ‘त्या’ Video चा अर्थ; म्हणाला, “हार्दिकपेक्षा..”
Top 5 Sedan Car
मारुतीच्या ‘या’ सेडान कारला भारतीय बाजारात तुफान मागणी; Amaze अन् Tigor कारलाही टाकलं मागे
IPL 2024 Lucknow Super Gitans vs Gurajat Titans Match Updates in Marathi
IPL 2024: चित्त्याच्या चपळाईने बिश्नोईने टिपला झेल, सारेच झाले अवाक; पाहा व्हीडिओ
Thipse and Gokhale
हम्पीकडून सर्वाधिक अपेक्षा! ‘कॅन्डिडेट्स’ बुद्धिबळ स्पर्धेबाबत ठिपसे, गोखले यांचे मत

आयपीएलमध्ये सर्वाधिक १५९ सामने खेळलेल्या सुरेश रैनाने ४५०० हून अधिक धावा ठोकल्या आहेत. रैनाने आयपीएलमध्ये आजवर १७३ षटकार आणि ४०१ चौकार ठोकले आहेत. यात एका शतकाचा आणि ३१ अर्धशतकांचा समावेश आहे. नाबाद १०० ही रैनाची सर्वाधिक वैयक्तिक खेळी राहिली आहे.

ख्रिस गेल (५५३)-

आयपीएलमध्ये आपल्या १०० व्या सामन्यात शून्यावर बाद होणाऱ्या ख्रिस गेलने सर्वाधिक २६२ षटकार आयपीएलमध्ये ठोकले आहेत. पण षटकार आणि चौकारांची गोळाबेरीज केली तर गेलचा दुसरा नंबर लागतो. गेलच्या नावावर आयपीएलमध्ये २९१ चौकार जमा आहेत. गेलने आजवर २१ अर्धशतकं, तर ५ शतकं ठोकली आहेत.