इंग्लंड दौऱ्याआधी यो-यो फिटनेस टेस्टमध्ये नापास झालेल्या अंबाती रायडूऐवजी सुरेश रैनाची संघात निवड करण्यात आलेली आहे. बीसीसीआयने याबद्दलची घोषणा केली आहे. मोहम्मद शमीपाठोपाठ यो-यो टेस्ट नापास झाल्यामुळे संघाबाहेर पडणारा अंबाती रायडू हा दुसरा खेळाडू ठरला आहे. मोहम्मद शमीला अफगाणिस्तान कसोटीतून माघार घ्यावी लागली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघ ३ टी-२०, ३ वन-डे आणि ५ कसोटी सामने खेळणार आहे. २०१५ साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरेश रैनाने आपला शेवटचा वन-डे सामना खेळला होता. या सामन्यात रैनाने अवघ्या १२ धावा केल्या होत्या.

इंग्लंड दौऱ्यासाठी भारताचा वन-डे संघ –

विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, सुरेश रैना, महेंद्रसिंह धोनी, दिनेश कार्तिक, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, सिद्धार्थ कौल, शार्दुल ठाकूर, भुवनेश्वर कुमार

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suresh raina replaces ambati rayudu for england odis
First published on: 16-06-2018 at 22:13 IST