भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैनाने क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून निवृत्त होत असल्याचं नुकतंच जाहीर केलं आहे. रैना हा त्याच्या आक्रमक फलंदाजीमुळे जगभरात ओळखला जातो. याआधी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं होतं. आता त्याने क्रिकेटच्या सर्वच प्रकारांमधून निवृत्ती घेतली आहे. रैनाने अचानकपणे घेतलेल्या या निर्णयामुळे सर्वच क्रिकेटप्रेमींना आश्चर्याचा धक्का बसला आहे. तसेच त्याचे चाहतेदेखील नाराजी व्यक्त करत आहेत. दरम्यान, त्याने क्रिकेटच्या सर्वच प्रकारांमधून निवृत्ती जाहीर केलेली असली तरी तो आगामी काळात जगभरातील क्रिकेट लीगमध्ये फलंदाजी करताना दिसू शकतो. तशी माहिती खुद्द सुरेश रैनानेच दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >> भारत विरुद्ध श्रीलंका : टीम इंडियासमोर ‘करो या मरो’ची स्थिती; सर्वोत्कृष्ट Playing 11 साठी आहेत ‘हे’ तीन पर्याय

सुरेश रैनाने आज क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत होत असल्याचं जाहीर केलं आहे. याआधी त्याने १५ ऑगस्ट २०२० रोजी महेंद्रसिंह धोनीसोबत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतला होता. रैनाने क्रिकेटच्या सर्वच प्रकारांमधून संन्यास घेतलेला असला तरी तो आगामी काळात इतर देशांमध्ये वेगवेगळ्या क्रिकेट लीगमध्ये खेळताना दिसू शकतो. याबाबत बोलताना “मी सर्वात अगोदर १० सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजमध्ये खेळणार आहे. दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, यूएई लीगकडूनही मला संपर्क साधण्यात आला आहे. संपूर्ण चित्र स्पष्ट होताच मी त्याबाबत कळवेन,” असे सुरेश रैनाने सांगितले आहे.

हेही वाचा >> Asia Cup 2022 : भारतापुढे ‘करो या मरो’ची स्थिती; आव्हान टिकवण्यासाठी श्रीलंकेवर विजय हवाच; जाणून घ्या नेमकं गणित

सुरेश रैनाचे क्रिकेट करिअर

डावखुऱ्या सुरैश रैनाने भारतीय संघाला अनेक सामने जिंकून दिलेले आहेत. भारताकडून त्याने १८ कसोटी, २२६ एकदिवसीय तर ७८ टी-२० सामने खेळले आहेत. आपल्या या कारकिर्दीत त्याने टेस्ट साम्यात ७६८ धावा, एकदिवसीय सामन्यात ५६१५ धावा तर टी-२० सामन्यात १६०४ धावा केल्या. क्रिकेटच्या या तिन्ही प्रकारांत त्याने सात शतकं तर ४८ अर्धशतकं लगावली.

हेही वाचा >> IND vs PAK : पाकिस्तानच्या मुलींमध्ये कोहलीची क्रेझ, भारत-पाक सामन्यातील ‘या’ खास फोटोची होतेय चर्चा

आयपीएलमध्येही रैनाने नेत्रदीपक कामगिरी केलेली आहे. त्याला मिस्टर आयपीएल म्हणून ओळखले जाते. त्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत ५५२८ धावा केल्या. आयपीएलमध्ये त्याच्या नावावर एक शतक आणि ३९ अर्धशतकं आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suresh raina will play road safety world series and sri lanka south africa league prd
First published on: 06-09-2022 at 15:09 IST